उडीद आणि मूग

भूईमुगाच्या कळीला सुकविणारा विषाणू (शेंडेमर)

GBNV

विषाणू

थोडक्यात

  • कोवळी पानांवर थोडे पिवळे ठिपके दिसतात जे नंतर वाढुन पिवळा आणि तपकिरी सुकलेल्या गोल कडांच्या डागात आणि पट्ट्यात बदलतात.
  • तपकिरी सुकणे नंतर देठ, फांद्या आणि कळ्यांपर्यंत पसरतो.
  • बाधीत रोपात खुंटलेली वाढ, विकृत पाने आणि सामान्य पिवळेपणा दिसतो.
  • छोट्या आणि आक्रसलेल्या बिया विकण्याजोग्या नसतात आणि पिकाची प्रत कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

ह्या रोगाचे प्राथमिक लक्षण आहे कोवळ्या पानांवर थोडे पिवळे ठिपके दिसणे जे नंतर मोठे होऊन पिवळे आणि तपकिरी सुकलेले गोलाकार डाग आणि पट्टे बनतात. तपकिरी सुकणे नंतर वाढुन देठ आणि वर वाढणार्‍या कळ्या देणार्‍या फांद्यांपर्यंत पोचते ज्याने फुलांच्या रचना खराब होतात, म्हणुन बड नेक्रोसिस रोग हे नाव आहे. थोडे गरम हवामान ह्यांना भावते. बाधीत रोपे खुजी होतात, त्यावर सामान्य पिवळेपणा दिसतो, नविन कोंबात वृद्धी होते आणि नविन पाने विकृत असतात. देठांवरही ठिपके आणि रंगहीनता असते आणि बिया छोट्या आक्रसलेल्या असुन त्यावरही डाग असतात. जर रोपांना लवकर लागण झालेली असेल तर पिकाचे फारच नुकसान होते .

शिफारशी

जैविक नियंत्रण

ज्वारी किंवा नारळाच्या पानांचा अर्क पेरणीनंतर २० दिवसांनी फवारला असता फुलकिड्यांच्या संख्येला परिणामकारकरीत्या नियंत्रित करता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य संसर्गासाठी रसायनिक उपचार शक्य नाहीत. तरीपण काही उपचार फुलकिडे वाहकांचे नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध आहेत. डायमिथोएट किंवा थियामेथॉक्झॅम सारख्या कीटनाशकांचे फवारे पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी प्रतिबंधक उपाय म्हणुन मारल्यास शेंडेमराची घटना खूपच कमी होते. इमिडाक्लोप्रिडचे २मि.ली./ली दराने बियाणांवर उपचार केले असताही फुलकिड्यांवरुद्ध चांगले प्रभावी असतात.

कशामुळे झाले

भुईमुगावरील शेंडेमर हा रोग विषाणूंमुळे होतो. रोपाला लागण सतत होत रहाते आणि किड्यांच्या जातींवर (थ्रिप्स पाल्मि) वर अवलंबुन असते जे रोपाच्या भागांवर आणि रसावर गुजराण करतात. भुईमुगाची रोपे नसल्यास फुलकिडे शेतातील किंवा आजुबाजुच्या पर्यायी यजमानांवर गुजराण करतात जसे कि सदर्न मारीगोल्ड (टॅगेटिस मायन्युटा), आणि सबटेरॅनियन क्लोव्हर (ट्रिफोलियम सबटेरॅनियम). म्हणुन खासकरुन किड्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी ह्या रोपांना काढुन टाकणे महत्वाचे आहे. घनदाट रोपणी केल्यास फुलकिड्यांना भुईमुगाच्या पिकावर बसण्यास अडथळा होतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास प्रतिरोधक प्रकारची बियाणे वापरा.
  • लवकर पेरणी केल्याने वाहक किड्यांची उच्चीची संख्या वाढ टाळता येईल.
  • वाहकांची वाढ होऊ नये म्हणुन रोपे घनदाट लावा.
  • मका, बाजरीची अंतरपिके लावल्यास वाहकांची हालचाल थोडी कमी होईल.
  • जी पिके शेंडेमरीला संवेदनशील आहेत त्यांच्या आजुबाजुला भुईमुग लावु नका जसे कि हिरवे किंवा काळे चणे.
  • तण आणि वाहकांच्या वाढीला बढावा देणारे यजमान काढुन टाका.
  • पहिले लक्षण दिसल्यानंतर ६ अठवड्यानंतर रोपांचे सर्व अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा