OYDV
विषाणू
कोणत्याही वाढीच्या अवस्थेत संक्रमण होऊ शकते आणि पहिल्या वर्षाच्या रोपांच्या जुन्या पानांवर लक्षणे प्रथम आढळतात. सुरवातीची लक्षणे म्हणजे पिवळे ओबड धोबड पट्टे बनल्यामुळे ठिगळासारखी संरचना निर्माण होते. जशी लक्षणे वाढत जातात तशी पाने सुरकुततात, मऊ पडतात, खालच्या बाजुकडे गोळा होतात आणि अखेरीस सुकतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पूर्णपणे पिवळी पडु शकतात आणि रोपे खुजी होतात. कंद अजिबात विकसित होत नाहीत आणि जर झालेच तर ते लहान आकाराचे राहून त्यांना अकालीच कोंब येतात उदा. साठवणीच्या काळात. बीजोत्पादनासाठी लागवड केलेल्या क्षेत्रात फुलांचे दांडे विकृत होतात, फुले कमी लागतात व पर्यायाने बिजोत्पादन व त्यांची प्रतही कमी भरते. उगवण क्षमता सुद्धा चांगलीच प्रभावित होते.
ह्या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. माव्याविरुद्धच्या उपचारात येतात नीम तेलाचे द्राव २% चे आणि निंबोळी अर्क (एनएसकेइ) ५%.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांच्या बाबतीत रसायनिक उपचार शक्य नाहीत. एमामेक्टिन बेन्झोनेट, इनडॉक्साकार्ब किंवा एनएसकेइचा वापर मावाच्या नियंत्रणासाठी केला जातो.
कांद्यावरील पिवळा खुज्या विषाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात. शेतातील पिकांच्या अवशेषावर हे दीर्घ कालावधी पर्यंत जगु शकतात. जास्त करुन ह्या विषाणूचा प्रसार संक्रमित झाडाच्या भागांनी जसे कि कंद, रोप आणि शेतातील इतर स्वयंभू रोपांमुळे होत असतो. ह्या रोगाचे यजमान फारच कमी आहेत जे अॅलियम कुटुंबाच्या प्रजातींपुरतेच सिमीत आहेत (कांदा, लसुण, छोटे कांदे / मद्रासी कांदे आणि इतर कांदावर्गीय शोभिवंत झाडे). ह्या रोगाचा प्रसार मावाच्या विविध प्रजाती (उदा. मायझस पर्सिके) अविरतपणे करत असतात. ते विषाणूला त्यांच्या सोंडेत घेऊन निरोगी रोपांतुन रसशोषण करतेवेळी त्यांना आत सोडतात. बर्याचदा, हे रोग त्याच झाडामध्ये इतर विषाणूजन्य रोगांसोबत संयोजनात उद्भवतात. ह्या संक्रमणामुळे तिथे पीकाचे कमी किंवा जास्त नुकसान ह्यावरच अवलंबुन असते. उदा. जर रोपांना लीक पिवळ्या पट्ट्याच्या विषाणूंसह संक्रमण झाल्यास पिकाचे नुकसान जास्त होते.