CGMMV
विषाणू
रोगाच्या सुरवातीच्या काळात, नविन पानांवर फिकट पिवळसर हिरवे ठिपके येतात व शिरा स्पष्ट दिसतात. गंभीर संक्रमणात पानांवर पिवळसर ठिपके येणे, चुरगळणे किंवा विकृत आकाराची होणे, झाडाची वाढ खुंटून कालांतराने करपणे होते. जुनी पाने पांढरट पिवळी पडून अकली गळतात. फळांवरील लक्षणे पूर्णतः लक्षणविरहित (निदान बाहेरुन तरी) पासून ते दाट ठिपके, वेडीवाकडी फळे व अकाली गळणे पर्यंत काहीही असतात. शेवटची काही लक्षणे खासकरुन वाढलेल्या तापमानात स्पष्ट दिसतात. काही वेळा, फळांवर बाहेरुन काहीच लक्षणे दिसत नाहीत पण आतुन ती रंगहीन व करपट असतात. अकाली फळगळ देखील या रोगाचे सामान्य लक्षण आहे.
जर बियाणांना ७० डिग्री सेल्शियस कोरड्या गरमीत तीन दिवसांपर्यंत उपचार केले असता सक्रिय विषाणू पासुन मुक्त होतील, पण तरीही त्या बियांची उगवण क्षमता चांगली असते. उपलब्ध असल्यास सीजीएमएमव्ही चाचणी किट वापरा. चावणार्या कीटकांसाठी जैविक कीटनाशक वापरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. रयासनिक कीटनाशके जी चावणाऱ्या किड्यांसाठी वापरले जातात ती या विषाणूंचा प्रसारही रोखु शकतात. काकडीवरील ग्रीन मॉटल विषाणू सारख्या विषाणूजन्य रोगांवर थेट उपचार शक्य नाही.
ही लक्षणे काकडीवरील ग्रीन मॉटल (सीजीएमएमव्ही) विषाणूमुळे होतात, जे काकडी, कलिंगड व खरबुज सारख्या वेलवर्गीय पिकांवर संक्रमण करतात. हे विषाणू जमिनीतील झाडांच्या अवशेषात फार काळापर्यंत सक्रिय राहु शकतात. या रोगाचा प्रसार संक्रमित बियाणे, शेतकामाच्या वेळी झालेल्या जखमांमुळे, शेतीउपयोगी अवजारे किंवा भुंग्यासारख्या किड्यांच्या उपद्रवामुळे होतो. यांचा प्रसार कलम केल्याने किंवा जे कार्य झाडाला जखमा करून केली जातात अशा सर्व कामादरम्यान होतो. रसशोषक किडी (उदा. मावा, कोळी, पांढरीमाशी) या रोगास प्रसारित करत नाहीत. एकदा झाड या रोगाने संक्रमित झाल्यानंतर, या विषाणूविरूद्ध कोणताही ज्ञात इलाज उपलब्ध नाही. विशेषतः हरितगृहामध्ये, या विषाणूच्या संक्रमणांची संख्या वाढत आहे.