द्वीदल धान्य

घेवड्यावरील सामान्य मोझाईक व्हायरस

BCMV

विषाणू

थोडक्यात

  • फिकट आणि गडद हिरव्या ठिगळाची नक्षी पानांच्या पात्यांवर (हिरव्यावर हिरवी ठिगळे) येते.
  • पानांचे काही भाग उंचावतात, सुरकुततात किंवा विकृत होतात.
  • नंतरच्या टप्प्यावर, पाने खालच्या बाजुला मुडपतात किंवा गुंडाळतात.
  • वाढीच्या सुरवातीला संक्रमित झालेली रोपे खूपच खुजी होतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

सुरवातीला, तीनपर्णे थोड्या फिकट रंगाची होतात. हळुहळु, फिकट आणि गडद हिरवी ठिगळ नक्षी पानांच्या पात्यावर (हिरव्यावर हिरवी ठिगळे) उमटते. काही शीरा किंवा त्यांचे भाग पिवळे पडतात. जसा रोग वाढत जातो, पानांचे भाग सुरकुततात, फोड येतात आणि विकृत होतात. उशीराच्या लक्षणात येते पाने खाली मुडपणे किंवा गुंडाळणे.ज्या रोपांना वाढीच्या सुरवातीच्या काळात संक्रमण झाले ती फारच खुजी आणि वांझ होतात आणि त्यांच्या शेंगा फारच कमी असुन प्रत्येक शेंगेत दाणेही फारच कमी भरतात. काही संवेदनशील प्रकारात, विषाणू मुळांना काळे पाडतात, हे लक्षण जर तापमान ३० डिग्री सेल्शियसच्या वर असेल तरच दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विषाणूंचे थेट उपचार शक्य नाहीत. खनिज तेले सौम्य करुन वापरल्यास माव्यांद्वारे विषाणूंचे वहन कमी होते पण ह्या तेलाचे उच्च प्रमाण मात्र रोपांना विषकारक असते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूंच्या संसर्गासाठी रसायनिक उपचार शक्य नाहीत. माव्यांवरील रसायनिक उपचार सहसा प्रभावी नसतात.

कशामुळे झाले

ह्या संक्रमणाचा मुख्य स्त्रोत संक्रमित बियाणेच आहे. दुय्यम संक्रमण रोपारोपावरुन संक्रमित परागकण, वाहक उपद्रव (बहुधा मावा) किंवा शेतात काम करताना रोपाला झालेल्या इजेतुन होते.लक्षणे आणि उत्पन्नावरील प्रभाव हा रोपाच्या प्रकारावर, हवामान परिस्थितीवर (तापमान आणि आर्द्रता) आणि संक्रमण होण्याच्या वेळेप्रमाणे असतो. फरसबी ह्या विषाणूला पूर्ण प्रतिकार करते, तर पोल बिन्स आणि बुश बीन्स जास्त असुरक्षित असतात. संवेदनशील प्रकाराचे विषाणूजन्य बियाणे (ज्या बियाणात विषाणू असतात) पेरल्यास जवळपास १००% नुकसानही पाहिले गेले आहे. माव्यांमुळे नंतर होणारे संक्रमण कमी गंभीर असते. ३० डिग्री सेल्शियसच्या वरील तापमानात लक्षणे जास्त खराब होतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी बियाणे आणि साहित्य घ्या.
  • शक्य असल्यास लवचिक वाण लावा.
  • झाडीत मावे शिरु नयेत म्हणुन रोपणी दाटीने करा.
  • माव्यांची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • संक्रमित रोपे पहिले लक्षण दिसताक्षणीच काढुन टाका.
  • इतर बीन उत्पादक शेतांपासुन दूर लागवड करा.
  • यजमान नसणार्‍या रोपांबरोबर पीक फेरपालट करा.
  • माव्यांना अडथळा करण्यासाठी सहचर रोपे लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा