आलुबुखारा

स्टेक्लेनबर्गर रोग

Prunus necrotic ringspot virus

विषाणू

थोडक्यात

  • पानांचे भाग, फुले, कळ्या आणि फुटवे (विषाणूच्या प्रजातीप्रमाणे) यामध्ये रंगहीनता आणि पेशीसमूहाचा काही भाग नष्ट झालेला दिसतो.
  • पिवळे किंवा क्लोरोटिक धब्बे किंवा पानांवर विखुरलेले ठिपके दिसतात.
  • काही वेळा कोवळ्या पानात छिद्रे दिसतात किंवा ती फाटलेली दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
चेरी
अधिक

आलुबुखारा

लक्षणे

विषाणूंची प्रजाती, झाडाचा प्रकार आणि पर्यावरणीय परिस्थिती ह्याप्रमाणे लक्षणे फार गंभीर, सौम्य ते लक्षणे नसणे अशा विविध प्रकारे असतात. लक्षणे पानांवर, कळ्यांवर, फुलांवर, फुटव्यांवर किंवा फळांवरही असु शकतात ज्याचे वैशिष्ट्य त्या भागातील रंगहीनता येते किंवा पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो. एकेका फांदीला कळ्या लागणे आणि पानांची वाढही वेगवेगळ्या वेळी होते आणि फुटव्यांची मरही दिसते. विकसित होणार्‍या पानांवर क्लोरोटिक किंवा ठळक पिवळे धब्बे, क्लोरोटिक किंवा पिवळे विखुरलेले ठिपके, वलयाकार डाग, रेषा आणि/किंवा "ओकच्या पानांची"नक्षी उमटते. गंभीर बाबतीत, पिवळसर झालेले भाग सुकतात आणि गळतात ज्यामुळे फाटणे, विकृती किंवा भोक पडण्यासारखे परिणाम दिसतात. फळे उशीरा पक्व होतात आणि फळांवर डाग आल्याने ती विक्रीयोग्य रहात नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

स्टेक्लेनबर्गर रोगाचा सामना करणे फार कठिण आहे. बियाणांवर गरम हवेचे थर्मोथेरपी (३८ अंशाचे उपचार, २४-३२ दिवस) किंवा गरम पाण्याचे उपचार केल्यास साठवण निरोगी केली जाऊ शकते. एपिकल मेरिस्टेम कल्चर (विषाणूमुक्त) पद्धतींद्वारे नविन झाडांची पिढी लावल्यासही परिणामकारक ठरते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सामान्यपणे विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण कीटकनाशकांनी केले जात नाही. रोगाच्या प्रसारासाठी फुलकिडे संभवत: वाहकाचे काम करीत असल्याने त्यांच्या नियंत्रणामुळे संक्रमणाच्या घटना कमी होऊ शकतात.

कशामुळे झाले

पीएनआरएसव्हीमुळे प्रुनसच्या पुष्कळ प्रजातींमध्ये सुकलेले वलयाकार डाग उद्भवतात, सहसा ह्या लक्षणातुन झाड नंतर सावरते. रोपाच्या वंशवृद्धीतुन विषाणूंचा फैलाव होतो, ज्यामुळे ती झाडाच्या राखीव साठ्यात आणि मुळांच्या कलमात शिरु शकतात ह्यामुळे बागेत समस्या निर्माण होऊ शकतात. संक्रमित परागकणात आणि बियाणातही विषाणू दिसु शकतो ज्याचे वहन ह्या प्रकाराने परागीकरण झालेल्या झाडात होते. मधमाशा किंवा इतर किडे संक्रमित परागकणांना बागेत नेतात आणि वहनाचे काम करतात. फुलकिड्यांद्वारेही विषाणूंचे वहन होते, तथापि रोगाचा प्रसार करण्यात फुलकिड्यांचे योगदान आणि महत्व अजुनतरी माहिती नाही. पीएनआरएसव्ही फुलांच्या सगळ्या भागांना संक्रमित करतो, म्हणुन बियांवरही संक्रमण संक्रमित परागकणांमुळे, ओव्हुलेंमुळे किंवा दोन्हीमुळे होऊ शकते. हा विषाणू फळांनाही संक्रमित करु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित विषाणूमुक्त बियाणे घ्या.
  • कलमाला आधार देण्यासाठी विषाणूमुक्त लाकडाचा वापर करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • रोगट रोपांची सामग्री गोळा करुन खोल पुरा किंवा जाळुन टाका.
  • इतर बागेत वापरलेली मधमाशांची बाजारु पोळी वापरु नका.
  • जास्त स्वच्छता ठेवा.
  • संक्रमित बागेजवळ नविन झाडे न लावण्याची शिफारस केली जाते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा