Fusarium/Aspergillus/Phytophthora/Rhizopus/Diplodia
बुरशी
बुरशीजन्या बोंड कुजेची चिन्हे ही वाढत्या लक्षणांनी समजतात. सुरवातीला, कोवळ्या हिरव्या बोंडावर छोटे तपकिरी वा काळे ठिपके येतात, जे नंतर वाढुन पूर्ण बोंड व्यापतात. प्रभावित बोंड गडद तपकिरी ते काळे होतात, मऊ पडतात आणि भिजल्यासारखे दिसतात. जसजसा रोग वाढतो, तसतसा रोग आतील भागात पसरतो आणि बिया व कापूस कूजतात. गंभीर बाबतीत, बुरशीमुळे बोंड अकालीच उघडतात, ज्यामुळे कपाशीवर डाग येतात आणि रुई खराब होते. आर्द्र हवामानात, बोंडावर डोळ्यांनी दिसणारी बुरशीची वाढ होते.
बोंडांची कूज पूर्ण नियंत्रणात आणणे हे सेंद्रीय आणि जैविक पद्धतीने थोडे आव्हात्मकच आहे. संशोधक ट्रायकोडर्मा व्हिरिडे सारख्या पर्यायांचा विचार करत आहेत पण अजुनही व्यावसायिक तत्वावर हे उपलब्ध नाहीत.
रोग पसरणे थांबविण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि मँकोझेब यांची बीजप्रक्रिया व फवारणी घेऊन सुरवात करा. तसेच फ्लॉक्सपायरॉक्सॅड आणि पायराक्लोस्ट्रोबिन यांचे सस्पेंशन तीव्रतेत मिश्रण करुन विविध जंतुंचा हल्ला थांबवा. जेव्हा प्रथमत: रोग दृष्टीस पडेल तेव्हा हे मिश्रण वापरा आणि नंतर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी १५ दिवसांनंतर परत वापरा. जेव्हा कीटनाशके व कोणतेही रसायनिक उत्पादन वापरता तेव्हा आपण संरक्षक कपडे घालणे आणि लेबलावरील सूचना नीट वाचणे महत्वाचे आहे. नियम हे देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील ठराविक मार्गदर्शनाचे पालन करा. ह्यामुळे सुरक्षेची हमी असते आणि यशस्वी वापराचा संभव वाढतो.
कपाशींच्या बोंडांची कूज ही जमिनीतील आणि बियाणांतील विविध बुरशींमुळे होते. अति नत्र, खूप पाणी देणे, पाऊस आणि उच्च आर्द्रता ह्यामुळे ही जोखीम वाढते. हा रोग जास्त करुन झाडांच्या खालील भागातील बंद बोंडांना होतो आणि पेरणीनंतर सुमारे १०० दिवसांनी दिसतो. बहुधा बोंडअळी आणि लाल किडा यांसारख्या किड्यांनी बोंडास केलेल्या फटींतुन वा जखमेतुन बुरशी आणि जिवाणू आत शिरतात. संक्रमित बोंडावरील बुरशीने हवेत सोडलेल्या बुरशीच्या बीजाणुंमुळेही ह्या रोगाचा प्रसार होतो.