Peziotrichum corticola
बुरशी
काळ्या पट्ट्यांसारखी नक्षी पानांच्या शिरा आणि मध्य शिरेवर, काटक्या, फांद्यांवर दिसतात. मुख्य खोडास क्वचितच प्रभावित केले जाते, जोपर्यंत संक्रमण अगदीच गंभीर होत नाही. जसजसा रोग वाढतो तसतसे काळे मखमली धब्बे मोठ्या आकाराचे होतात.
झाडांच्या ठराविक रोगांचा प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी बोर्डा पेस्ट किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड पेस्ट वापरा आणि बोर्डा (१%) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड (०.३%) चे मिश्रण फवारा. जर आपणांस रोगाची चिन्ह दिसली तर आपण प्रभावित भागांना चोळुन त्यावर कॉपर मिश्रणाने रंगवु शकता. अधिक तीव्र उपचारांसाठी ५ किलो कॉपर सल्फेट आणि ५ किलो भिजवलेला चुना यांना ५० ली. पाण्यात मिसळा. पहिल्यांदा कॉपर सल्फेटला २५ली. पाण्यात विरघळवुन घ्या. उरलेल्या २५ली. पाण्यात भिजवलेले चुना मिसळा, मग दोन्ही मिश्रणे एकत्र करताना सतत ढवळत रहा. असे बोर्डा मिश्रण तयार करुन फवारा.
रोग नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम ५०% डब्ल्युपीची शिफारस केली जाते. हेक्झाकोनाझोल ५%इसी आणि क्लोरोथॅलोनिल ७५%डब्ल्युपी यासारखे इतर उत्पादनेही वापरली जातात.
झाडांवरील खवल्या किड्यांवर बुरशीची वाढ होते; ह्यामुळे फांद्या मरत नाहीत आणि खवले किडे हेच काटकीच्या नुकसानीचे मुख्य कारण आहेत. ह्याचे विकसन पावसाळ्यात होते आणि उन्हाळ्यात वाढ थांबते, पाठी फक्त काळे पट्टे रहातात.