Pythium aphanidermatum
बुरशी
जमिनीशी थेट संपर्कात असलेल्या फळांवर तपकिरी भाग दिसण्यापासुन लक्षणांची सुरवात होते जी नंतर मऊ, कुजलेल्या भागात बदलतात.आर्द्र हवामानात, फळांवरील या कुजलेल्या भागांवर कपाशीसारखी वाढ सुरु होऊन ते भाग पूर्ण व्यापते. रोपवाटिकेतही हेच जंतु कोवळ्या व तयार झालेल्या रोपांना नुकसान करून त्यांना मारतात. हे जंतु मुळांनाही नुकसान पोचवतात आणि कुजवतात: ज्यामुळे नंतर पाने पिवळी पडतात कारण वेलींसाठी अन्नद्रव्याचे शोषण होत नाही. फळांवरील कुज पीथियममुळे होते जी फयटोप्थोरा आणि स्क्लेरोटिनियामुळे झालेल्या कुजीसारखीच दिसते. ह्यांना वेगळे ओळखण्यासाठी लक्षात असु द्यात कि: पीथियममुळे झालेली कूज ही कपाशीसारखी किंवा दाढीच्या साबणाच्या फेसासारखी दिसते. तर फयटोप्थोरामुळे झालेली कूज ही पिठा सारखी किंवा पावडरीसारखी दिसते. आणि स्क्लेरोटिनियामुळे झालेली कूज ही दाट कापसासारखीच दिसते पण त्यावर काळे, टणक डाग असतात जे खोडासही बाधीत करतात.
ह्यासाठी कोणतेही प्रमाणित आणि वापरण्याजोगे जैविक नियंत्रण नाही.
एकदा का लक्षणे दिसु लागली, कि वेल किंवा फळे काहीच वाचविले जाऊ शकत नाही. संक्रमण प्रतिरोध करण्यासाठी, बियाणे आणि रोपांवर रसायनिक उपचार करा. पेरणीपूर्वी बियाणांवर उपचार करा आणि बियाणांना शिफारशीत प्रमाणातील द्रावणात बुडवा. ह्याव्यतिरिक्त, मातीच्या वरच्या थरांवरही उपचार करा. ह्या उपचारांचा प्रभाव हा, बुरशीनाशके मातीच्या वरच्या एक इंच थरापर्यंत सिंचनाद्वारे अथवा पावसाद्वारे किती पसरतात ह्यावर अवलंबुन आहे.
कपाशी वाढ करणारे जंतु हे जमिनीत रहातात! ह्यांना उष्ण, आर्द्र हवामान आणि साचलेले पाणी ह्यास धार्जिणे असते. सिंचनाच्या पाण्याबरोबर हे पसरतात. हे वेलींच्या पेशींमध्ये सहज शिरतात आणि वेलींची अन्नद्रव्य शोषण क्षमता नष्ट करतात तसेच वेलींचे प्रभावित भाग कुजवतात. छाटणी करताना किंवा पाने काढताना जखमा झालेल्या वेली ह्यास जास्त संवेदनशील होतात ज्यामुळे जंतुंचा प्रसार सहज होतो.