Neofabraea spp.
बुरशी
तोडणीनंतर, यांत्रिक पद्धतीने तोडणी केलेल्या जागी लक्षणे दिसतात. पानांवरील लक्षणे मात्र विशेषकरुन हिवाळ्यात उशीरा आणि वसंत ऋतुच्या सुरवातीला दिसतात. पानांवरील व्रण सुमारे ३-४ मि.मी. व्यासाचे असुन थोडे दबलेले असतात. त्यांची सुरवात छोट्या गोलाकार वाळलेल्या (पिवळ्या) व्रणांपासुन होते. वसंत ऋतुपासुन उन्हाळ्याच्या सुरवातीपर्यंत हे व्रण हळहळू पूर्ण वाळतात. फांद्यांवरील जखमांत ०.५-३ सें.मी. लांबीचे देवीचे व्रण दिसतात ज्यामुळे काटक्यांची मर होते. गंभीर प्रादर्भाव झाल्याने पानगळ होते आणि नंतरच्या मोसमातील उत्पादन प्रभावित होते. फळांवरील ठिपक्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते काळे, थोडेसे दबलेले असुन भोवताली ओलसर प्रभावळ असते.
आजतागायत तरी, कोणतेही प्रभावी जैविक नियंत्रण उपाय उपलब्ध नाहीत.
ही विशेष समस्या अलिकडील वर्षातच दिसुन आली आहे. रसायनिक नियंत्रणावरील अभ्यास सध्या विकसित केला जात आहे. तोडणीनंतर संरक्षक फवारणी करणे हा सध्यातरी ह्या समस्येवरील एकमात्र उपाय आहे. छाटणी आणि तोडणीतील यांत्रिक पद्धतीची भूमिकेतुन जंतुंचा प्रसार याचा अभ्यास व्हावयास हवा. आपल्या भागातील अद्यतनित माहिती ही आपल्या स्थानिक कृषीशास्त्रज्ञांकडुन मिळवा.
नियोफॅब्रिया आणि फ्लिक्टेमा दोन्ही प्रजाती ह्या रोगाशी संबंधित आहेत. जेव्हापासुन ऑलिव्ह उद्योगाने विस्तार आणि तीव्र पिकांच्या काळात प्रवेश केला तेव्हापासुन ऑलिव्ह बागेतील लक्षणे ही अलिकडील काळात खूपच वाढली आहेत. यांत्रिक पद्धतीने छाटणी आणि तोडणी केल्याने पाने, कोंब आणि फांद्यांवरील जखमांच्या संख्येत वाढ झाली आहे, तसेच प्रादुर्भाव होण्यासाठी जखमांची आवश्यकता असते.