तूर

तुरीच्या पानावरील फायलोस्टिकटा ठिपके

Phoma cajanicola

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर व्रण येतात.
  • असंख्य बारीक व काळे ठिपके.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

तूर

लक्षणे

पानांवर गोल, अंडाकृत किंवा V आकाराचे व्रण येतात. व्रण हे राखाडी किंवा गव्हाळ रंगाचे व अरुंद आणि गडद कडा असलेले असतात. जुन्या पानांवर असंख्य बारीक ठिपके (पायक्निडियल बॉडीज हे अलैंगिक बीजाणू पसरवण्याचे साधन) असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

रोग यशस्वीपणे नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही जैविक पद्धती ज्ञात नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पानांवर ठिपके दिसू लागताच नियमन केलेल्या उत्पादनांचा वापर करावा.

कशामुळे झाले

नुकसान हे फायलोस्टिकटा कजानीकोला या बुरशीमुळे होतो. जेव्हा पानांवर फळे येतात तेव्हा या वंशाचे वर्णन फायलोस्टिकटा असे केले जाते तर जेव्हा वनस्पतीच्या इतर भागांवर येते तेव्हा वर्गीकरणानुसार फोमामध्ये ठेवले जाते. बुरशी हे प्रभावित दस्कटामध्ये जगते व बियाणं द्वारे प्रसार पावते. उबदार, आर्द्र परिस्थिती रोगाच्या विकासास अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • बुरशीचे अस्तित्व कमी करण्यासाठी पीक फेरपालट आणि नियमित मशागत करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा