Peronospora hyoscyami
बुरशी
जुन्या, गळलेल्या पानांवर एक किंवा गटाने पिवळे ठिपके दिसतात. ह्या व्यतिरिक्त पानांच्या छिद्रांखाली दाट राखाडी बुरशी दिसते. हे ठिपके पसरतात आणि पान कालांतराने वाळते. अखेरीस झाडाची वाढ नेहमीपेक्षा कमी होते. काही वेळा बुरशी फांद्यांतुन पूर्ण पसरते. ह्यामुळे कोणत्याही वाढीच्या टप्प्यावर झाडाची वाढ खुंटते आणि मरगळ होते. ह्या फांद्यांच्या आत तपकिरी पट्टे दिसतात. रोपवाटिकेत हा रोग असल्याची चिन्हे म्हणजे मृत किंवा मरत असलेली कोवळी रोपे होय. पहिल्यांदा पानांचा वरचा भाग सामान्य दिसतो पण एक-दोन दिवसातच पिवळे ठिपके येतात. रोपांची मर सुरु होते आणि फिकट तपकिरी पडतात.
सध्यातरी निळ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी जैविक उत्पादने उपलब्ध नाहीत.
समशीतोष्ण तसेच उपउष्णकटिबंधीय प्रदेशातील तंबाखू लागवडींच्या भागात बहुतेक वेळा निळ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी रसायनिक उपचारांचीच आवश्यकता भासते. अवशेषात्मक कार्यासह डायथियोकार्बामेटस किंवा आंतरप्रवाही उत्पादने वापरली जातात. आपल्या भागातील नियमांप्रमाणेच बुरशीनाशकांचा वापर करा. योग्य वापरासाठी लेबलांवरील सूचनांचे नेहमीच पालन करा. आपल्या निवडीच्या बुरशीनाशकांविरुद्ध बुरशीच्या प्रतिकाराबाबत माहिती मिळवा. आंतरप्रवाही संसर्गासाठी रसायनिक फवारणी प्रभावी नसते.
पेरनोनोस्पोरा ह्योस्यामि नावाच्या झाडावरील जंतुंमुळे निळी बुरशी येऊन हानी होते. हा बुरशी रोग तंबाखूच्या झाडांना प्रादुर्भावित करतो. ह्याचा प्रसार, वार्याने उडणार्या बीजाणूंमुळे आणि संक्रमित पुनर्लागवडीमुळे होतो. एकदा का ह्याचा प्रादुर्भाव झाला कि हा झाडांच्या भागांवर संक्रमण करीत वाढतो. इष्टतम परिस्थितीत बुरशीच्या पुढच्या पिढीचे बीजाणू सुरवातीच्या प्रादुर्भावानंतर ७-१० दिवसातच तयार होतात. बुरशीला बीजाणू तयार करण्यासाठी थंड, ओल्या तसेच ढगाळ हवामानाची आवश्यकता असते आणि अशा परिस्थितीत रोगाचा गंभीर उद्रेक होऊ शकतो. जेव्हा हवामान उष्ण, कोरडे आणि भरपूर सूर्यप्रकाशाचे असते तेव्हा बुरशी कशीबशी तग धरते.