आले

र्‍हिझोम कूज

Pythium aphanidermatum

बुरशी

थोडक्यात

  • पाने पिवळी पडतात.
  • आडव्या वाढणार्‍या मूळ फांद्यांच्या भागांत तपकिरी रंगहीनता दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
आले
हळद

आले

लक्षणे

फसव्या फांद्याच्या फुटव्यातुन संक्रमण सुरु होऊन वर आणि खाली पसरते. प्रभावित फसव्या फांद्यांचे फुटवे पाण्याने भिजल्यासारखे दिसतात आणि मुळांच्या आडव्या फांद्यांपर्यंत कूज पसरते. नंतरच्या टप्प्यावर, मूळांतही संक्रमण झालेले दिसुन येते. खालच्या पानांची टोके फिकट पिवळी पडतात जो पिवळटपणा नंतर हळुहळु पानाच्या पात्यांपर्यंत पसरतो. संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर, पानांचा मधला भाग हिरवा रहातो तर शीरा पिवळ्या पडतात. पिवळेपणानंतर फसव्या फांद्यांची पाने कोमेजतात, मरगळतात आणि वाळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

गाईचे शेण थोडे पाण्यात भिजवुन किंवा द्रव खत करुन प्रत्येक मल्चिंगनंतर दिल्याने मातीतील सूक्ष्म जंतुंच्या हालचालीत वाढ होते आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. लागवडीसाठी प्रतिकारक किंवा सहनशील वाण घ्या. मका, कापूस किंवा सोयाबीनसह पीक फेरपालट करा. विरोधी जाती जसे कि ट्रायकोडर्मा व्हिरिडे, टी. हर्झियानम आणि टी. हॅमाटम (४० ग्रा. प्रति चौ.मी.) वापरामुळे बुरशीच्या जंतुंच्या वाढीत बाधा येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाच्या घटना टाळण्यासाठी साठवणीपूर्वी आणि लागवडीपूर्वी र्‍हिझोम्सवर मँकोझेब ०.३% नी ३० मिनिटांचे उपचार करा.

कशामुळे झाले

मातीजन्य बुरशी पायथियम अॅफानिदर्माटम मुळे हा रोग होतो ज्याची वाढ दक्षिण पश्र्चिमी पावसाळ्याच्या सुरवातीस मातीतील आर्द्रता वाढल्याने होते. बुरशी दोन प्रकारांनी जगु शकते. एक म्हणजे मृत मुळांच्या आडव्या फांद्या ज्या बियाणे म्हणुन राखल्या जातात, त्यात आणि दुसरे म्हणजे मुळांच्या आडव्या फांद्यांपासुन जमिनीपर्यंत जाणार्‍या क्लॅमिडोस्पोर्स आणि उस्पोर्स नावाच्या विश्रांतीच्या रचना किंवा कोषात. कोवळे फुटवे ह्या जंतुस फारच संवेदनशील असतात आणि जंतांच्या संसर्गामुळे रोग चांगलाच फोफावतो. ३० अंशापेक्षा जास्त तापमान आणि जमिनीतील जास्त आर्द्रता हे महत्वाचे पूर्व घटक रोगास धार्जिणे असतात. शेतातील पाण्याचा निचरा चांगला न झाल्यामुळे निर्माण होणारी पाणथळ परिस्थिती ही शेतातील रोगाची तीव्रता वाढविते.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा निचरा चांगला होण्याची खात्री करा आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागवडीसाठी निवडा.
  • संक्रमित रोपांचे काढुन नष्ट करण्यासारखे झाडांना निरोगी राखणार्‍या उपायांचा अवलंब करा.
  • हिरवी पाने (व्हिटेक्स नेगुंडो) ४-४.८ टन प्रति हेक्टरी लागवडीच्या वेळी अंथरा.
  • लागवडीनंतर ४०- ९० दिवसांनी परत २ टन प्रति हेक्टरी पाने पसरा.
  • किमान २-३ वर्षातुन पीक फेरपालट करा.
  • मातीची घडण बदलण्यासाठी नीम केक २५० ग्रा.
  • प्रति चौ.
  • मी.
  • आणि लाईम द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा