Hemileia vastatrix
बुरशी
सुरवातीच्या लक्षणात, २-३ मि.मी. व्यासाचे ठिपके पानांवर येतात. ठिपके मोठे होऊन गोलाकार मोठ्या डागात बदलतात जे नंतर चकचकीत नारंगी ते लाल आणि पिवळ्या किनारीसह तपकिरी होतात. पानांवरील डागांच्या बरोब्बर खालच्या बाजुस तसेच पावडरीसारखे डाग येतात, ज्यात नारंगी ते तपकिरी रंगाच्या बीजाणूंचे उत्पादन होते. पाने अखेरीस गळतात. पाने नसल्याने प्रकाश संश्र्लेषण होत नाही आणि झाडास अन्नद्रव्य न मिळाल्याने कॉफी उत्पादनात लक्षणीय घट होते.
रोग नियंत्रणासाठी जास्त व्यावसायिक जैव नियंत्रण रणनीति उपलब्ध नाहीत. प्रतिबंधक उपाय करण्याने रोग नियंत्रणाचे चांगले परिणाम मिळतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगास अनुकूल हवामान घटकांच्या उपस्थितीपूर्वी आणि त्या हवामानाचा काळ संपल्यानंतर परत एकदा, बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ५०% डब्ल्यूजी ची रोगप्रतिबंधक फवारणी केली जाऊ शकते.
हेमिलेइया वास्टाट्रिक्स नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते. कॉफीवरील तांबेरा झपाट्याने पसरतो आणि ह्या बुरशीच्या पसरण्यात पर्यावरणीय घटकांचा मोठाच हात असतो. त्यातही विशेष करुन वारा किंवा पाणी मोठीच भूमिका निभावतात. बीजाणूंचे वहन हवेतील धूळीबरोबर वार्याने शेतातील सुदूर कोपर्यात आणि इतर शेतात होते, किंवा जेव्हा बीजाणू जमिनीत पडुन पावसाच्या पाण्याने जवळपासच्या झाडांवर उडतात. हवामान ओले आर्द्र असताना आणि पावसाचे पाणी पानांवर पडले असताना कॉफीवरील तांबेरा फोफावतो आणि एका झाडावरुन दुसरीकडे पसरतो. प्रभावित कॉफी झाडांची फळे चांगली विकसित होत नाहीत आणि हलकी असतात. कॉफीवरील तांबेर्याच्या गंभीर उद्रेकाने उत्पन्नाचे नुकसान ७५% पेक्षाही जास्त होऊ शकते.