हळद

हळदीच्या पानावरील ठिपके

Colletotrichum capsici

बुरशी

थोडक्यात

  • राखाडी केंद्र असणारे तपकिरी ठिपके.
  • पाने वाळतात आणि मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
हळद

हळद

लक्षणे

पानांवर राखाडी केंद्राचे फिकट व लांबट ठिपके दिसणे ही पहिली लक्षणे आहेत. ठिपके बारीक व १-२ मि.मी. व्यासाचे असतात. ठिपके एकमेकात मिसळुन बहुधा ४-५ सें.मी. लांबीचे व २-३ सें.मी. रुंदीचे होतात. संक्रमणाच्या पुढील टप्प्यात काळ्या ठिपक्यांची केंद्रीत वर्तुळे दिसतात. राखाडी केंद्री पातळ होतात आणि अखेरीस फाटतात. गंभीर संक्रमणात पानाच्या दोन्ही बाजूस शेकडो ठिपके दिसतात. गंभीरपणे प्रभावित पाने मरगळुन वाळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टी. हर्झियानम, टी. व्हिरिडेसारखे जैविक घटक वापरा ज्यांनी या रोगाचे प्रमाण कमी झाल्याचा पुरावा दर्शविला आहे. तसेच पी. लाँगिफोलियाच्या झाडाचा अर्क देखील रोग नियंत्रणासाठी प्रभावी आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पेरणीपूर्वी बेणे मँकोझेब ३ ग्रा. किंवा कार्बेंडाझिम १ ग्रा. प्रति ली. पाणी याप्रमाणात ३० मिनीटांचे उपचार करा आणि सावलीत वाळवा. मँकोझेब २.५ ग्रा. किंवा कार्बेंडाझिम १ ग्राम प्रति ली. पाणी चे पंधरवड्याच्या अंतराने २-३ फवारण्या घ्या.

कशामुळे झाले

बेण्याच्या सालीवरील बुरशीमुळे हा रोग होतो जो पेरणीच्या वेळचा प्राथमिक स्त्रोत असतो. दुय्यम प्रसार वारा, पाणी व इतर भौतिक तसेच जैविक घटकांमुळे होतो. संक्रमित अवशेषात जंतु वर्षभर जगु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • सुगुणा व सुदर्शनसारखी सहनशील वाण लावा.
  • रोगमुक्त भागातील बेणे निवडा.
  • नियमित पीक फेरपालट करा.
  • मिरचीसारख्या पर्यायी यजमानांपाशी लागवड करणे टाळा.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी संक्रमित आणि वाळलेली पाने गोळा करुन जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा