Phakopsora euvitis
बुरशी
सुरवातीला पानांच्या खालच्या बाजुला नारिंगी-तपकिरी रंगाची पावडरीसारखी भुकटी दिसते. नंतर पानांच्या दोन्ही बाजुला छोटे पिवळसर ते तपकिरी डाग उमटतात. जसा रोग वाढतो तसा हा नारिंगी भाग गडद तपकिरी ते जवळपास काळा होतो आणि लांबट डाग तयार होतात. जास्त संक्मरण झाल्यास पूर्ण वेलच पिवळी किंवा तपकिरी पडते आणि अखेरीस अकाली पानगळ होते. नंतरच्या वाढीच्या मोसमात कोंब चांगले वाढत नाहीत ज्यामुळे वेलींची वाढ खुजी होते. रोगामुळे कोंबांची वाढ चांगली होत नाही, फळांची प्रत कमी भरते आणि उत्पन्नाचे नुकसान होते.
सल्फर असणार्या बुरशीनाशकांचे फवाने वापरावेत. बुरशीनाशके प्रभावी ठरण्यासाठी पावसाळी हवेत फवारणी घेऊ नये.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बोर्डॉक्स मिश्रण, कॅप्टाफोल, डायफोलाटान, प्रोपिकोनाझोल, टेब्युकोनाझोल किंवा अॅझॉक्सिस्ट्रोबिन असणार्या बुरशीनाशकांचा वापर करा जे जंतुंच्या घटना फार कमी करतात असे म्हटले जाते. नंतरच्या वाढीचय्या मोसमात द्राक्ष मळ्यात ३-४ फवारे बेकॉर (०.१%) १५ दिवसांच्या अंतराने घेतल्यास तांबेर्याचे नियंत्रण केले जाऊ शकते.
फाकोस्पोरा व्हिटिस नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. बुरशीचे बीजाणू रोपांच्या कचर्यात आणि पर्यायी यजमानात जगतात आणि ह्यांचे वहन वार्याने होते. पानाच्या खालील बाजुस नारिंगी रंगाच्या पावडरीच्या भुकटीत तांबेर्याचे जंतु विकसित होतात. पिवळसर नारिंगी युरेडिनोस्पोर्स (पातळ त्वचेचे सुरवातीच्या अवस्थेतील बीजाणू) चे पुंजके पानांच्या खालच्या बाजुस तयार होतात ज्यामुळे पानाच्या वरच्या बाजुस वाळल्यासारखे गडद डाग येतात. २० अंश सेल्शियच्या वरील तापमान आणि आर्द्र हवामान ह्या रोगाच्या वाढीस अनुकूल असते. बीजाणुंचे वहन सहजपणे वार्याने आणि हवेच्या झोताने होते.