Puccinia kuehnii
बुरशी
पानांवर छोट्या मृत ठिपक्यांच्या रुपाने डागांची सुरवात होते. नंतर ते वाढुन ४ मि.मी. लांब आणि ३ मि.मी. रुंद अशा नारिंगी-तपकिरी डागात बदलतात. डाग बहुधा पानाच्या देठापाशी गटा-गटाने केंद्रीत झालेले दिसतात. नारिंगी बीजाणू पानांच्या खालच्या बाजुला निर्माण केले जातात. गंभीरपणे प्रभावित झालेले पानांचे भाग वाळतात ज्यामुळे, पिकाची झाडी कमी होते. गंभीर प्रकरणात पर्णकोषावर देखील डाग येतात ज्यामुळे दूरवरुन पाहिल्यास पूर्ण पानांची झाडी तपकिरी दिसते.
आजपर्यंत या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रक उपाय आम्हाला ठाऊक नाहीत. जर आपणांस या रोगाच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता कमी करण्याचे खात्रीलायक पद्धती माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांमुळे उत्पादनाचे नुकसान कमी होते. स्ट्रोबिल्युरिन श्रेणीतील बुरशीनाशके जसे कि पायराक्लोस्ट्रोबिन आणि अॅझोक्सिस्ट्रोबिन ज्यांचा वापर रोगाच्या उपचारासाठी केला जातो, त्यांची फवारणी करावी. तसेच ट्रायझोल श्रेणीतील बुरशीनाशके जसे कि मेटकोनाझोल आणि प्रॉपिकोनाझोलचा वापर ३-४ अठवड्यांच्या अंतराने केला जाऊ शकतो.
प्युसिनिया क्युनी नावाच्या बुरशीमुळे रोग होतो. याचा प्रसार तांबेर्याद्वारे होतो जो, अतिसूक्ष्म, हलके आणि कणखर बीजाणू निर्माण करतो ज्यामुळे याचा प्रसार झपाट्याने छोट्या आणि मोठ्या अंतरावर वार्याने आणि उडणार्या पाण्याने होतो. बीजाणू जमिनीतील झाडांच्या अवशेषांत देखील जगु शकतात. रोग बहुधा उन्हाळ्यात आणि नंतरच्या ऊबदार, ओल्या आणि खूप आर्द्र हवामान परिस्थितीत दिसुन येतो. हा जास्त पक्व ऊसाला (बहुधा ६ महिने वयाच्या) बाधा करतो. या रोगाची वाढ आणि प्रसार हा ३० अंश तापमानापेक्षा जास्त तापमान आणि आर्द्रता ७० आणि ९०% असल्यास सीमित असते. जोराचा वारा आणि सातत्याने ढगाळ वातावरण हे रोग आणखीन वाढवते.