सफरचंद

सफरचंदावरील काजळी धब्बे (सूटी ब्लॉच)

Phyllachora pomigena

बुरशी

थोडक्यात

  • गडद हिरवे ती काळी काजळी बुरशीची वाढ फळांच्या पृष्ठभागावर दिसते.
  • गोलाकार ते अनियमित आकाराचे वेगवेगळे धब्बे येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

सफरचंद

लक्षणे

फळांच्या पृष्ठभागावर सुमारे ५ मि.मी. व्यासाचे किंवा जास्त मोठे अनियमित अकाराची किनार असणारे निस्तेज ते काळे काजळी धब्बे येतात. धब्बे एकमेकात मिसळुन पूर्ण फळही व्यापू शकतात. फळांच्या पृष्ठभागावरील काळे धब्बे दिसण्यात काळे किंवा धूसर असतात. धब्बे गडद हिरवे असुन अनियमित किनार असते. धब्बे बहुधा एक चतुर्थांश इंच व्यासाचे किंवा मोठे असतात आणि कदाचित एकमेकात मिसळुन फळाचा पूर्ण पृष्ठभाग व्यापू शकतात. शेकडो अतिसूक्ष्म गडद दंडाकृती कवचात असलेल्या बीजाणूंना (पिकसिडिया) बुरशीच्या गडद तंतुंनी (हायपे) विणल्याच्या परिणामी 'डाग' उमटतात. काळ्या धब्ब्यांची बुरशी बहुधा सालीच्या बाहेरच्या पृष्ठभागापुरतीच सीमित असते. क्वचितच कधीमधी हे हायपे सालीच्या पेशींच्या भिंतीत आणि सालीत शिरकाव करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

नारळाच्या साबणाचे उपचार उन्हाळ्यात केल्यास रोगाच्या घटना थोड्याशा कमी होतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्ट्रोबिल्युरिन बुरशीनाशके, क्रेस्झिम मिथाइल किंवा ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिनचे मूल्यांकन काजळी धब्ब्यांसाठी केले गेले आहे आणि थियोफेनेट मिथाइल, कप्तान (इन्स्पायर सुपर आणि इतर प्रिमिक्सेस ही)चांगले नियंत्रण पुरवितात असा विश्र्वास आहे पण तितकेसे प्रभावी नाहीत. मँकोझेब ७५% डब्ल्यूजी (३ ग्रॅम प्रति ली.) पाण्यात मिसळुन १० ली. फवारणी द्रव प्रति झाड वापरावे.

कशामुळे झाले

फिलाकोरा पोमिगेना (पुष्कळशा असंबंधित बुरशी)मुळे हा रोग होतो. बुरशीचे बीजाणू वार्‍याबरोबर वाहून लागवडीत शिरतात. उन्हाळ्यातिल दीर्घकालीन वाढीव तापमान आणि त्यासह वारंवार पाऊन तसेच उच्च आर्द्रता अशी परिस्थिती रोगाच्या उद्रेकास अनुकूल असते. बुरशीच्या वाढीमुळे रंगहीनता रहाते. ह्यामुळे लाकडी आणि हरबॅसियस झाडांची पाने, काटक्या आणि फळांवर प्रभाव पडतो. वसंत ऋतुत आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला बीजाणू तयार होतात.


प्रतिबंधक उपाय

  • बागेतुन आणि आजुबाजुच्या कुंपणावरुन ब्रँबल्ससारखे पर्यायी यजमान काढुन टाका.
  • उन्हाळ्यात झाडी छाटुन शेंडे मोकळे करा म्हणजे हवा चांगली खेळती राहील तसेच पावसानंतर फळ चांगली कोरडी होतील.
  • फळांचे घोस वेगळे करता येण्यासाठी तसेच रोगाच्या घटना टाळण्यासाठी झाडी मोकळी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा