आंबा

आंब्याच्या फांदी टोकाची कूज

Lasiodiplodia theobromae

बुरशी

थोडक्यात

  • फळे, झाडाची साल आणि पाने रंगहीन होतात.
  • फांद्या मरतात.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

काटक्या आणि फांद्या वाळतात ज्यामुळे मरतात आणि पानगळ होते. पाने गडद रंगाची होतात आणि कडा मुडपतात. काटक्या मरतात आणि गळुन पडतात. संक्रमण झालेल्या भागासभोवती कँकर्स येतात जे नंतर लाकडास वाळवतात (रोपाचा प्रभावित भाग गडद होतो) आणि नंतर लाकुड मरते. फांद्यांतुनही चिकट स्त्राव गळतो जो नंतर पूर्ण फांदीलाच व्यापतो. फळांतील कूज बहुधा तोड्यानंतरच दिसते आणि देठाकडुनच सुरु होते. प्रभावित भाग सुरवातीला राखाडी होतो आणि नंतर काळा पडतो. गंभीर संक्रमण झाल्यास फळे पूर्ण कूजतात आणि आक्रसुन ममीसारखी होतात. फळातील गरही रंगहीन होतो. फळाच्या देठाच्या बुडाकडील सालीचा भागही गडद होतो. प्रभावित भाग मोठे होत जाऊन गोलाकार काळे धब्बे निर्माण होतात आणि जर आर्द्र तापमान असेल तर झपाट्याने वाढुन पूर्ण फळच दोन- तीन दिवसात काळे पडते. गर तपकिरी आणि मऊ होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस आणि झँथोमोनाज ओरिझे पीव्ही. ओरिझेचा वापर रोगाच्या व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. ट्रायकोडर्मा हर्झियानमसुद्धा वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाचा उद्रेक टाळण्यासाठी आपण छाटणी केल्यानंतर त्याजागी (रंग, खळ) बुरशीनाशके वापरु शकता. रोगाची गंभीरता कमी करण्यासाठी कार्बेंडाझिम (५० डब्ल्यूपी) किंवा थियोफेनेट मिथाइल (७० डब्ल्यूपी) १पीपीएम ए.आय. किंवा जास्त ची फवारणी करु शकता. तोड्यापूर्वी १५ दिवस कार्बेंडाझिम (०.०५%) आणि प्रॉपिकोनाझोल (०.०५%) ची फवारणी केल्याने फांदी टोक कूज कमी करण्यात प्रभावी ठरते. तोड्यानंतर गरम पाण्याचे उपचार आणि कार्बेंडाझिम हे खास करुन फांदी टोक कूजीविरुद्ध प्रभावी ठरतात. नियंत्रित वातावरणातील साठवणीत फांदी टोक कूजीच्या नियंत्रणासाठी गरम कार्बेंडाझिमच्या उपचारानंतर लगेच प्रोक्लोराजचे उपचार करणे गरजेचे आहे.

कशामुळे झाले

लॅसियोडिप्लिडिया थियोब्रोमे नावाच्या मातीत रहाणार्‍या बुरशींमुळे नुकसान उद्भवते जिचे भरपूर श्रेणीतील यजमान आहेत आणि उष्णकटिबंधीय तसेच समशीतोष्णकटिबंधातही हि सापडते. ही शेतातील पिकास आणि साठवणीतील उत्पादांनाही प्रभावित करते. ही पिक्निडियाच्या रुपात (बीजाणू असणारे दंडाकृती कवच) पिकांच्या अवशेषात जिवंत रहाते. बीजाणूंचे वहन वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने होते आणि रोपाच्या नुकसानीत किंवा नुकत्याच केलेल्या छाटणीच्या जखमातुन यजमानात प्रवेश करते. पाण्याचा ताण असलेली झाडे जास्त गंभीर लक्षणे दर्शवितात. जास्त तापमान आणि जास्त पाऊस रोगास पूरक असतो.


प्रतिबंधक उपाय

  • चांगली स्वच्छता राखा.
  • ओल्या हवेत छाटणी करु नये आणि छाटणीच्या जखमा किमान राखा.
  • संक्रमित रोपांचे भाग काढुन टाका.
  • तोडा केलेली फळे ४८ अंश सेल्शियस गरम पाण्यात २० मिनीटे बुडवा.
  • फळांना १० अंश सेल्शियस किंवा कमी तापमानात साठवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा