Mycosphaerella brassicicola
बुरशी
बहुधा लक्षने जुन्या पानांवरच सामान्यपणे दिसतात पण जर कोवळी पानेही प्रभावित झाली असतील तर लक्षणे गंभीर समजावी. सुरवातीला पिवळ्या प्रभावळीचे ३-४ मि.मी.चे गडद डाग पानांच्या पृष्ठभागावर दिसतात. ते हिरवट तपकिरी किंवा राखाडीसर काळे असतात आणि पानांच्या शीरांपाशी सीमित असतात तसेच नंतर वाढुन २-३ सें.मी. मोठे होतात. डागांच्या मधोमध केंद्रीत छोटे गडद ठिपके वर्तुळाकार दिसतात. ठिपके एकमेकात मिसळुन पाने पिवळे पडते. गंभीर संक्रमण झाल्यास अकाली पानगळ होते. बांगडी डागाच्या बुरशीमुळे येणारे डाग हे अल्टेरनेिया जातीसारखेच दिसतात. मुख्य फरक असतो तो म्हणजे बांगडीधाग हे राखाडी असतात आणि त्यात काळ्या रंगाची टाचणीच्या टोकासारखी बारीक केंद्रीत वर्तुळे असतात. रोपाच्या जमिनीवरील सर्वच भाग लक्षणे दर्शवु शकतो. वेगवेगळ्या डागातुन केंद्रीत गडद वर्तुळे असतात ज्यात काळे बीजाणू असतात आणि स्पष्ट अशी पिवळी प्रभावळ असते. गंभीर हल्ला झाल्यास हे डाग गळतात आणि पूर्ण रोपच प्रभावित होऊन काळे पडते. बियाणांच्या साठवणीत बुरशीमुळे जशी वनस्पतीनाशक २,४-डी मुळे झाल्यासारखी विकृतता येते. साठवलेल्या कोबीतही गडद डाग येऊन खोलपर्यंत शिरतात.
आजतागायत ह्या उपद्रवाविरुद्ध कोणतीही जैव नियंत्रण पद्धत आमच्या माहितीत नाहीत. जर आपणांस ह्याच्या घटना कमी करण्याची किंवा लक्षणांची गंभीरता कमी करण्याची यश स्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पेरण्यापूर्वी बियाणांवर थिराम किंवा मँकोझेबचे उपचार करा. थंड आणि आर्द्र हवेत क्लोरोथॅनोनिल, मँकोझेब किंवा कॉपरचे फवारे घ्या. जिथे भाज्यांचे भरपूर उत्पादन केले जाते तिथे हवेतील मोठ्या संख्येने असणार्या बीजाणूंमुळे तसेच जिथे हवामान थंड आणि आर्द्र आहे जे रोगाच्या प्रसार आणि संसर्गास अनुकूल आहे तिथे हा रोग नियंत्रण करणे कठिण आहे
मायकोफेरेला ब्रासिसिकोलाच्या हवेतील जंतुंमुळे नुकसान उद्भवते. उडणार्या पण्याने, वार्याने आणि पावसाने बीजाणू पसरतात. बुरशीला प्रजननासाठी १००% सापेक्ष आर्द्रता किमान लागोपाठ ४ दिवस असण्याचा कालावधी लागतो. १६-२० अंश सेल्शियस तापमान आणि जमिनीवरील पाण्याचा निचरा चांगला न होण्याने जंतुंच्या वाढीस बढावा मिळतो. बियाणे उत्पादनातच प्रामुख्याने रोग समस्या येतात आणि बियाणात जंतु रहातात. संक्रमित तण आणि यजमान पिकात किंवा अवशेषात बुरशी विश्रांती घेते. बीजाणूंचा प्रसार वार्याने होतो. थंड आर्द्र हवा रोगाच्या विकसनास अनुकूल असते.