Stagonospora sacchari
बुरशी
पानांच्या पात्यावर पांढरे ते पिवळसर बारीक ठिपके येणे आणि ते बहुधा संक्रमणानंतर ३ ते ८ दिवसात दिसणे हे सुरवातीच्या लक्षणात येतात. लाल किंवा लालसर तपकिरी ठिपके कोवळ्या पानांवर येतात आणि हळुहळु लांबट होऊन स्पष्ट पिवळ्या वर्तुळाकार कडेचे फिरकीच्या आकाराचे होतात. रोग गंभीर असल्यास, हे डाग एकमेकात मिसळतात आणि वाहक शीरांना लागुन टोकापर्यंत फिरकीच्या आकाराच्या पट्ट्यात बदलतात. पहिल्यांदा डाग लालसर तपकिरी असतात जे नंतर फिकट पिवळ्या रंगाचे होतात आणि लाल कडा येतात. छोटे काळे पायक्निडिया सुद्धा पानांच्या मृत भागात निर्माण होतात. गंभीरपणे संक्रमित झालेली पाने वाळतात आणि अकाली गळतात. संक्रमणामुळे खोडाची उंची, घेर आणि पेरांची संख्या तसेच हिरव्या पानांची संख्या कमी होते.
आजपर्यंत या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रक उपाय आम्हाला ठाऊक नाहीत. जर आपणांस या रोगाच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता कमी करण्याचे खात्रीलायक पद्धती माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कार्बेंडाझिम आणि मँकोझेबसारखी बुरशीनाशके वापरा. बोर्डो मिश्रण किंवा क्लोरथॅलोनिल, थियोफेनेट-मिथाइल आणि झयनेबची फवारणी करा.
स्टॅगोनोस्पोरा सखारी नावाच्या बुरशीच्या जंतुंमुळे लक्षणे उद्भवतात ज्यामुळे गंभीर प्रमाणात करपणे होते आणि झाडाची प्रकाश्संस्लेषण मंदावते. शक्यतो हे रोग पावसानंतर किंवा शेतात जास्त सिंचन केल्यानंतर होतो. ह्यामुळे कार्यरत पानांचे भाग कमी होतात. या रोगाचा प्रसार, जमीन, ऊसाचे बेणे आणि शेतीची अवजारे याद्वारे होत नाही. या रोगाचे वहन मुख्यत: वार्याचा प्रवाह, वारा आणि पावसाने होते. कोरड्या हवामानात, पट्टे जास्त झपाट्याने निर्माण होतात. बहुतेक पट्टे एकमेकात मिसळतात, लांबट होतात, पक्वतेत अडथळा आणतात आणि पेशींचा रंग बदलतात. वसंत ऋतु आणि नंतरच्या काळात तसेच हिवाळ्यातही जर तापमान जंतु मरु शकतील इतके कमी नसेल तर पट्ट्यांचे निर्माण होणे जास्त दिसुन येते. अखेरीस पानाचा पूर्ण पृष्ठभागच विशिष्ट करपल्यासारखा दिसतो.