भेंडी

भेंडी पिकातील सर्कोस्पोरा पानावरील ठिपके

Cercospora malayensis

बुरशी

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला तपकिरी अनियमित ठिपके येतात.
  • पाने वाळतात आणि मरगळतात.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भेंडी

लक्षणे

सुरवातीला पानांच्या खालच्या बाजुला अनियमित ठिपके दिसतात. जमिनीलगतची जुनी पानेच बहुधा रोगाने प्रभावित होतात. जसा रोग प्रगत होतो तशी पाने कोरडी आणि तपकिरी होतात आणि मुडपतात व अखेरीस गळतात. गंभीर संक्रमणात, संपूर्ण झाडाची पानगळ होऊ शकते. सुरवातीला रोगाची लक्षणे पानांचा खालच्या भागावर सूक्ष्म ठिपक्यांच्या रुपात दिसतात. नंतर फिकट तपकिरी ते राखाडी बुरशीची वाढ पूर्ण खालील भागावर आढळते. गंभीर बाबतीत, पानांच्या वरच्या भागावर देखील सुकलेले भाग आढळतात. संक्रमित पाने अखेरील वाळतात आणि पानगळ होते. रोग खालच्या पानांपासुन वर प्रगत होत जातो आणि फांद्या तसेच फळांना संक्रमित करु लागतो आणि अशीच लक्षणे तिथेही दिसु लागतात. पी. अॅबेलमोस्की मुळे होणारे काळ्या बुरशीच्या कोनाकृती डागांशी याची गल्लत केली जाऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजपर्यंत आम्हाला या रोगाविरूद्ध कोणत्याही जैविक नियंत्रण पद्धतीची माहिती नाही. आपणास या रोगाची घटना किंवा लक्षणांची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यशस्वी पद्धत माहित असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. दुपारच्या वेळी पानांच्या खालच्या बाजुला बुरशीनाशकची फवारणी घ्या. पेरणीनंतर एका महिन्याने आणि दर पंधरा दिवसांच्या अंतराने गंभीरतेप्रमाणे कॉपर ऑक्झिक्लोराइड ०.३%, मँकोझेब ०.२५% किंवा झिनेब ०.२% यासारख्या संरक्षक बुरशीनाशकांचा वापर करावा.

कशामुळे झाले

हा रोग सर्कोस्पोरा मलेन्सिस आणि सर्कोस्पोरा अबॅलमोस्की नावाच्या बुरशीमुळे उद्भवतो. ही जमिनीवर पडलेल्या संक्रमित झाडांच्या अवशेषात जगते आणि विश्रांती घेते म्हणुन भेंडीची मुळे आणि खालची पाने संक्रमित होतात. बीजाणूंचा दुय्यम प्रसार वार्‍याने, पावसाने, सिंचनाच्या पाण्याने आणि यांत्रिक उपकरणांद्वारे होतो. आर्द्र मोसमात पानावरील डाग फारच जास्त दिसतात कारण बुरशीला उबदार आणि ओले हवामान अनुकूल असते. पाऊस आणि जास्त आर्द्रता संक्रमणास, रोग विकसनास आणि पानांवर सूप्त बीजाणू निर्माण होण्यास अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • केवळ प्रमाणित बियाणे सामग्री वापरा आणि लागवडीचे अंतर योग्य ठेवा जेणेकरून पाने वार्‍याने वाळतील.
  • आपल्या शेताचे नियमित निरीक्षण करा आणि संक्रमित पाने काढुन (जाळणे हा ही एक पर्याय आहे) नष्ट करा.
  • चांगल्या तण व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात येतो.
  • झाडाला पुरेसे पाणी आणि खत देऊन ताण टाळा.
  • सिंचन संध्याकाळ ऐवजी सकाळी द्या आणि तुषार सिंचन टाळा आणि जमिनीवर पाणी साचू देऊ नका.
  • यजमान नसलेल्या पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा