Albugo candida
बुरशी
पांढरा तांबेरा एखाद्या झाडाला स्थानिक किंवा प्रणालीनुसार संक्रमित करू शकतो. संक्रमणाच्या प्रकाराप्रमाणे लक्षणे दिसतात. स्थानिक संक्रमणात सुरवातीच्या टप्प्यांवर पानांच्या खालच्या बाजुला, छोट्या फांद्यांवर आणि फुलांच्या भागांवर फोड दिसतात. ते सुमारे १-२ मि.मी. व्यासाचे असतात आणि पांढरे किंवा फिकट पिवळे असतात. जशी लक्षणे वाढतात, तसे पानाखालील फोडाच्या बरोबर वर पानाच्या वरच्या बाजुला फिकट हिरवे ते पिवळसर रंगहीनतेचे भाग दिसतात. आंतरप्रवाही संक्रमणात, रोगाची वाढ झाडाच्या आतच होत असल्याने झाड असामान्य वाढते, प्रभावित झाडे विकृत होतात किंवा गाठी येतात.
नीम, कांदा आणि लसणीचा अर्क वापरा. नीलगिरीच्या अर्क तेलात विस्तृत बुरशीविरोधक गुण असतात आणि पांढर्या तांबेर्यावर पानांवर आणि कणीस लागायच्या सुमारास वापरल्यास प्रभावी असते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँकोझेब किंवा मेटालॅक्सिल आणि मँकोझेब वापरुन बीजोपचार करा. औषधांचा वापर प्रथम जमिनीत आणि नंतर फवारणी द्वारे करावा. पिकाचा कालावधी आणि पावसाच्या प्रमाणानुसार वापराची वारंवारता बदलू शकते. समशीतोष्ण हवामानात पीक चक्राच्या काळात एकदा जमिनीतून आणि किमान १ ते २ फवारणीद्वारे करण्याची शिफारस केली जाते.
पानांवरील हा रोग अलब्युगो किंवा प्युस्ट्युला नावाच्या बुरशीमुळे होतो. ब्रासिकासारख्या काही झाडांवर, पांढरे फोड आणि केवड्याची लागण सोबतीने होते. फोडात सफेद पावडरीसारखे बीजाणू असतात जे पक्व झाल्यानंतर वार्याने पसरतात. पांढर्याो तांबेर्याच्या बीजाणूंना ऊगवणीसाठी १३ ते २५ अंश तापमान, पाने किमान २-३ तास ओली असणे आणि ९०% वरील सापेक्ष आर्द्रता, जमिनीतील उच्च आर्द्रता आणि वारंवार पाऊस जरूरीची असते. जमिनीतील ऊस्पोर्स आणि त्या भागातील बारमाही तण यजमानांवरील स्पोरान्गिया हे प्राथमिक प्रसार करतात. दुय्यम प्रसारात वार्याने आणि पावसाच्या पाण्याने वहन होणार्या कोनिडिया (स्पोरान्गिया) किंवा ऑटोनॉमस झूस्पोर्स (किड्यांद्वारे वहन होणारे) बीजाणू जवळपासच्या झाडांना संक्रमित करतात. ब्रासिका कुटुंबातील बहुतेक प्रजातींना ही प्रभावित करतातच पण कोबीवर्गीय भाज्या, शोभेची झाडे आणि अनेक प्रकारच्या तणांनाही संक्रमित करतात. बीजाणू जमिनीत किमान ३ वर्षांपर्यंत जगतात.