आंबा

आंब्यावरील खपली रोग

Elsinoë mangiferae

बुरशी

थोडक्यात

  • फळांवर बारीक काळे व्रण येतात.
  • संक्रमित फांद्या थोड्या सूजल्यासारख्या दिसतात आणि राखाडी व्रण असतात.
  • पानांवर फिकट प्रभावळीचे तपकिरी डाग येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

ऐल्सिनोए मँगिफेरे नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. विविध घटकांनुसार जसे कि वाण, झाडाचे भाग, संक्रमणाच्या वेळी त्या भागाचे वय, झाडाचा जोम आणि समृद्धी, यामुळे लक्षणे बदलु शकतात. बारीक काळे व्रण कोवळ्या फळांवर येतात. पाने सुरकुततात, विकृत होतात आणि पानगळ होते. व्रण वाढुन फिकट तपकिरी खपल्यांमध्ये किंवा व्रण पडलेल्या भागात बदलतात. गंभीरपणे प्रभावित झालेली फळे अकाली गळतात तर झाडावर असणार्‍या फळांवर व्रण पडतात ज्यामुळे फळे विक्रीयोग्य रहात नाहीत. थोडासा उंचावलेला राखाडी, अंडाकृती ते लंबगोलाकार व्रण फांद्यांच्या भागांवरही येतात. क्वचितच, डाग पानांवर देखील येतात. तपकिरी डागासभोवती प्रभावळ दिसते आणि पानांच्या कडांवरही डाग येतात. जाड खपली पानांच्या खालच्या बाजुला आलेले ही पहाण्यात आले आहेत. संक्रमण गंभीर असल्यास पानगळ होते

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी कोणतेही जैविकनियंत्रण या बुरशीविरुद्ध विकसित करण्यात आलेले नाही. तथापि, कॉपर असणारी बुरशीनाशके वापरुन झाडांच्या संक्रमित भागांचे उपचार केले जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑक्झिक्लोराइड आणि हायड्रॉक्साइड किंवा किमान ऑक्साइड स्वरुपाची कॉपर बुरशीनाशके कळ्या लागण्याच्या काळापासुन ते फुलधारणेपर्यंत २-३ अठवड्याच्या अंतराने वापरा. फुलधारणेच्या आणि फळधारणेच्या काळात कॉपरच्याऐवजी मँकोझेब वापरा. ओली परिस्थिती बुरशीच्या संक्रमणास अनुकूल असते, म्हणुन बुरशीनाशकांचा वारंवार वापर करावा लागू शकतो ज्यामुळे पाण्याने धुऊन जाण्याची भरपाई देखील होते आणि उपचारांचा प्रभावही वाढतो.

कशामुळे झाले

दलदलीच्या खोलगट बागेत आंब्यावरील खपली रोग आढळते. सातत्याने पडणारा पाऊस आणि फळधारणा लवकर झाल्यानेही हे येते. फक्त कोवळे भागच या संक्रमणास संवेदनशील आहेत आणि फळे अर्ध्या आकाराची झाल्यानंतर याला प्रतिकार करतात. हे जंतु झाडाच्या जिवंत भागातच जगु शकतात. बुरशीच्या बीजाणूंचा प्रसार पावसाच्या उडणार्‍या पाण्याने किंवा वार्‍याने होतो ज्यामुळे दुय्यम संक्रमण होते. अन्यथा हे जंतु जमिनीतील कचर्‍यामध्ये जगतात. या लक्षणांची गल्लत अँथ्रॅकनोजच्या लक्षणांशी होऊ शकते फरक इतकाच आहे कि खपळी रोगमधील उंचवटलेल्या रचना अँथ्रॅकनोजमध्ये आढळत नाहीत.


प्रतिबंधक उपाय

  • गंभीरपणे प्रभावित झाडांवरील जुन्या संक्रमित फांद्या छाटुन संक्रमण कमी करणे शहाणपणाचे असते.
  • संक्रमण आणि रोगाच्या प्रसाराचा प्रतिबंध करण्यासाठी, जमिनीत राहू शकणारे झाडाचे मृत भाग काढुन नष्ट करा.
  • कारण बीजाणूंचा प्रसार पावसाच्या उडणार्‍या पाण्याने सहज होत असल्याने, रोगट फुलोरा, मृत फांद्या आणि प्रभावित फळे काढुन प्रसार कमी करणे शहाणपणाचे असते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा