Fusarium mangiferae
बुरशी
फ्युसारियम मँगिफेरे नावाच्या बुरशीच्या प्रजातीमुळे हा रोग होतो. रोपात बहुतेक वेळा झाडीची विकृती दिसते. रोपांना छोट्या फांद्या लागतात ज्याची पाने छोट्या खवल्यांसारखी दिसतात ज्यामुळे फांद्याच्या शेंड्याकडील भाग गुच्छा सारखे दिसतात. रोपांची वाढ खुंटते व अखेरीस मर होते. झाडीतील विविधताही फुलधारणेच्या काळात देखील विकृतता दर्शविते. अत्याधिक विकृत फुल फांदी मोठ्या फुलांमुळे दाट आणि घोटदार दिसते. प्रभावित झाडे दाट फांद्या आणि फुलांसह विकृती विकसित करतात. पानांचे आणि फांदीचे फुटव्यातुन वेडेवाकडे कोंब येतात ज्यांचे पेरे लहान असतात आणि पाने ठिसुळ होतात. पाने निरोगी झाडांवरील पानांपेक्षा खूपच बारीक असतात. एकाच झाडात सामान्य आणि अनैसर्गिक वाढ एकाच वेळी दिसु शकते.
संक्रमण कमी करण्यासाठी धतुरा स्ट्रामोनियम (आम्लमय), कॅलोट्रोपिस गिगान्टे आणि नीम (अॅझाडिराक्टिन)चे अर्क वापरा. ट्रायकोडर्मा हरझियानमही जंतुंची वाढ नियंत्रणात ठेवण्यात प्रभावी आहे. प्रभावित रोप नष्ट केली पाहिजेत. रोगमुक्त लागवड सामग्री वापरा. संक्रमित झाडांचा मातृवृक्ष म्हणून कधीही वापरु नका.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॅप्टन ०.१%च्या वापराने रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यात मदत होते. फॉलिडॉल किंवा मेटासिस्टॉक्स कीटकनाशकांची फवारणी नियंत्रक उपाय म्हणुन वापरा. कार्बेंडाझिम ०.१% ची फवारणी फुलधारणेच्या काळात १०,१५ किंवा ३० दिवसांच्या अंतराने करा. नॅप्थेलिन अॅसेटिक अॅसिड (एनएए) चा वापर १०० किंवा २०० पीपीएम याप्रमाणे केल्यास पुढच्या हंगामात रोगाच्या घटना कमी होतात. जस्त, बोरॉन आणि तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फुलधारणेपूर्वी आणि फळ काढणीनंतर केल्याने विकृतीच्या घटना नियंत्रित होण्यात किंवा कमी होण्यात मदत मिळते हे सिद्ध झाले आहे.
या रोगाचा प्रसार मुख्यत: संक्रमित रोप सामग्रीद्वारे होते. जमिनीतील जास्त ओलावा, कोळीचा प्रादुर्भाव, बुरशीचे संक्रमण, विषाणू, तणनाशक आणि इतर विषारी मिश्रणे बुरशीच्या वाढीस मदत करतात. लोह, जस्त आणि तांब्याची कमतरताही विकृतता देऊ शकते. रोगाचा प्रसार प्रभावित बागेत फार हळु होतो. फुलधारणेच्या वेळी तापमान १०-१५ अंश असल्यास वाढीत मदत होते.