हरभरा

हरबरा पिकावरील कोरडी मूळकुज

Macrophomina phaseolina

बुरशी

थोडक्यात

  • जर पीकास आर्द्रतेचा ताण असेल तर कोरडी मूळकुज रोग प्रबळ असतो.
  • अनुकूल परिस्थितीत तो उत्पादनाचे ५० ते १००% नुकसान करु शकतो.
  • हा जंतु मातीजन्य तसेच बियाणेजन्यही आहे.
  • फुलधारणेच्या नंतरच्या काळातच लक्षणे दिसतात: देठ आणि पाने मरगळतात आणि पिवळी पडतात.

मध्ये देखील मिळू शकते


हरभरा

लक्षणे

हरबऱ्याच्या शेतात, रोगाची सुरवात, रोपे अधुनमधुन वाळलेली दिसण्याने होते. रोगाचे पहिले लक्षण पाने पिवळी आणि वाळण्याने दिसते. ही संक्रमित पाने बहुधा एकाद दोन दिवसात गळतात आणि पूर्ण झाडच पुढच्या २-३ दिवसात संपूर्णपणे वाळते. प्रभावित झाडांची पाने आणि फांद्या बहुधा पिवळसर रंगाच्या असतात तरी काही बाबतीत, खालची पाने आणि खोड तपकिरी रंगहीनताही दर्शविते. सोटमूळ कोरड्या जमिनीत गडद आणि ठिसुळ होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पाने, खोड, साल, फळांचा गर आणि तैल अर्क जसे के अक्वेयस अर्क आणि नीमचे तेल मातीजन्य एम. फॅशियोलिना जंतुंच्या वाढीत बाधा आणतात. शत्रु जंतु/जैव नियंत्रक जसे कि ट्रायकोडर्मा व्हिरिडे आणि ट्रायकोडर्मा हरझियानम रोगांच्या घटना कमी करण्यात मदत करतात. टी. हरझियानम+पी. फ्लौरेसेन्स (दोन्ही ५ ग्राम प्रति किलो बियाणे दराने) वापरुन बीजप्रक्रिया करुन समृद्ध टी. हरझियानम+पी. फ्लौरेसेन्स च्या २.५ किलो प्रति २५० किलो शेणखत पेरणीच्या वेळी वापरुन जमिनीचे उपचार करावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कोरडी मूळकुजवर रसायनिक नियंत्रण प्रभावी नाही कारण एम फॅशियोलिनाच्या यजमानांची श्रेणी विस्तृत आहे आणि जमिनीतही फार काळापर्यंत जगु शकते. बुरशीनाशकांची बीजप्रक्रियेने हरबऱ्याच्या उत्पादनातील नुकसान काही प्रमाणात कमी करता येते कारण ही झाड कोवळी असताना जास्त संवेदनशील असतात. कार्बेंडाझिम आणि मँकोझेबने बुरशीनाशकांनी बीजप्रक्रिया करुन आळवणी केल्याने रोगाच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होतात.

कशामुळे झाले

मॅक्रोफोमिना फेशियोलिना नावाच्या मातीजन्य बुरशीच्या बीजाणूंमुळे किंवा बुरशीच्या धाग्यांमुळे रोगाची सुरवात होते. जेव्हा तापमान ३०-३५ अंश होते तेव्हा अचानक लक्षणे दिसतात. खास उष्णकटिबंधीय आर्द्र भागात तापमान जसे वाढेल आणि आर्द्रतेचा ताण जास्त वारंवार होईल तसे बुरशीची तीव्रताही वाढते. रोग बहुधा फुलधारणेच्या नंतरच्या काळात आणि शेंगा लागण्याच्या काळात येतो ज्यामुळे संक्रमित झाड पूर्णपणे वाळल्यासारखी दिसतात. यजमान पीक उपलब्ध नसल्यास बुरशी मातीतील मृत सेंद्रीय पदार्थांतील जंतुंशी स्पर्धा करीत जगते. एम. फॅशियोलिना अनुकूल परिस्थितीत उत्पादनाचे ५०-१००% नुकसान करु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास सहनशील वाण निवडा.
  • पक्वतेच्या वेळी जास्त तापमान टाळण्यासाठी लवकर तयार होणारे वाण लावा ज्यामुळे संक्रमण कमी होईल.
  • रोगाच्या लक्षणासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जमिनीची आर्द्रता चांगली राखा.
  • खोल नांगरुन संक्रमित झाडांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • काढणीनंतर, जमीन निर्जंतुक करण्यासाठी उन्हात तापू द्या.
  • उंचावलेल्या वाफ्यात लागवड करा आणि लागवडीपूर्वी सरी पाडा.
  • यजमान नसलेल्या उदा.
  • ज्वारी किंवा मेथीसह ३ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा