सोयाबीन

सोयाबीनच्या पानावरील अल्टरनेरिया ठिपके

Alternaria spp.

बुरशी

थोडक्यात

  • संक्रमित बियाणांपासुन नविनच ऊगवलेल्या रोपांची मर होते.
  • गोलाकार, केंद्रीत वर्तुळांसह तपकिरी ते राखाडी ठिपके झाडीवर दिसतात.
  • या ठिपक्यांचे केंद्र वाळुन गळते आणि बंदुकीच्या गोळीसारखा प्रभाव दिसतो तसेच अकाली पानगळ होते.
  • बिया लहान आणि आक्रसलेल्या होतात व गडद अनियमित आणि खोलगट भाग पृष्ठभागावर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कॅनोला
सोयाबीन

सोयाबीन

लक्षणे

पिकाच्या वाणाप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. संक्रमित बियाणांपासुन ऊगवलेल्या रोपांची बहुधा जंतुंमुळे कोलमड होते. जुन्या झाडात, केंद्रीत वाढीचे, स्पष्ट किनारी असलेले गडद तपकिरी, गोलाकार ठिपके जुन्या पानांवर प्रथम दिसतात. कालांतराने यांची लक्ष्यासारखी केंद्रे पातळ आणि कागदासारखी होऊन अखेरीस गळतात आणि पाने बंदुकीने गोळी मारल्यासारखी दिसतात. जसे हे डाग मोठे होऊन एकमेकात मिसळतात, पाने मृत पेशींनी भरतात, ज्यामुळे अकाली पानगळ होते. डाग पक्व शेंगांवर देखील येतात, ज्यातील दाणे आक्रसलेले, लहान आणि रंगहीन असतात आणि कुजीची लक्षणे दर्शवितात. तरीपण, रोग बहुधा पीक पक्व होताना होत असल्याने, उत्पादनाचे नुकसान जास्त होत नाही आणि त्यामुळे व्यवस्थापन शिफारशींची गरज नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सोयाबीनवरील अल्टरनेरिया पानावरील ठिपक्यांसाठी कोणतेही जैविक उत्पाद उपलब्ध नाहीत. सेंद्रीय उपचारात कॉपरवर आधारीत (२.५ ग्रॅ. प्रति ली.) बुरशीनाशकांचा वापर येतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हा रोग जर हंगामात शेवटी झाला तर ठराविक व्यवस्थापनाची गरज भासत नाही. जर हंगामात लवकर संक्रमण झाले तर बुरशीनाशके वापरण्याचा विचार करा. त्या बाबतीत, मँकोझेब, अॅझोक्सिस्ट्रोबिन किंवा पायराक्लोस्ट्रोबिनवर आधारीत उत्पादांचा वापर पहिली लक्षणे दिसताच केला जावा. उद्रेक होईपर्यंत उपचार टाळु नका कारण मग यशस्वी नियंत्रणासाठी फार उशीर झालेला असु शकतो. या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्यास या रोगाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी आहेत.

कशामुळे झाले

सोयाबीनवर अल्टरनेरिया पानावरील ठिपके हे अल्टरनेरिया प्रजातीच्या बुरशीमुळे होतात. हे जंतु शेंगांच्या सालीतुन आत शिरतात आणि दाण्यांना संक्रमित करतात जे नंतर बिया म्हणुन वापरल्यास दोन हंगामांच्या मधल्या काळात प्रसाराचा मुख्य स्त्रोत बनतात. बुरशी संवेदनशील तण किंवा शेतातील विघटिन न झालेल्या झाडांच्या अवशेषात देखील राहू शकते. रोपारोपांमधुन दुय्यम प्रसार वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने होतो. यासाठी पाने फार काळ ओली रहाणे आवश्यक आहे, असे झाले तर बुरशी काही तासातच लागण करते आणि नैसर्गिक छिद्रातुन किंवा किड्यांमुळे झालेल्या जखमातुन आत शिरते. रोगाच्या वाढीसाठी २०-२७ अंश तापमान आदर्श आहे. पीक रोपावस्थेत आणि हंगामात उशीरा जेव्हा पाने पक्व होतात तेव्हा याला जास्त संवेदनशील असतात. पावसाळ्यानंतर सिंचन केलेल्या सोयाबीनच्या पिकात या घटना जास्त महत्वाच्या असतात आणि झाडाला जर भौतिक किंवा पोषकांचा ताण असेल तर ते पूरकच असते.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य असल्यास प्रमाणित स्त्रोतांकडुन चांगल्या प्रतीचे, निरोगी बियाणे घ्या.
  • आपल्या भागात प्रतिकारक वाण मिळतात का ते तपासा.
  • लागवड करते वेळी झाडीत चांगली हवा खेळण्यासाठी रोपांत पुरेसे अंतर सोडा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी खास करुन जेव्हा हवामान रोगास पूरक असते तेव्हा शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • संक्रमित रोपे तसेच भवतालची रोपे देखील काढुन गोळा करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढा.
  • जेव्हा झाडी ओली असते तेव्हा शेतात काम करणे टाळा.
  • काढणीनंतर शेतातुन झाडांचे सर्व अवशेष नष्ट करा.
  • संवेदनशील नसलेल्या पिकांसह किमान तीन वर्षांसाठी तरी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा