बटाटा

लवकर येणारा करपा

Alternaria solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • केंद्रीत वाढीचे गडद आणि पिवळ्या प्रभावळी ठिपके पानावर येतात.
  • पाने वाळुन गळतात.
  • फळे कुजु लागतात आणि अखेरीस गळतात.


बटाटा

लक्षणे

लवकर येणाऱ्या करप्याची लक्षणे प्रथम जुन्या झाडीत, फांद्या आणि फळांत दिसतात. राखाडी ते तपकिरी ठिपके पानांवर येतात आणि हळहळु केंद्रीत होऊन साफ केंद्राभोवती वाढु लागतात जे वैशिष्ट्यपूर्ण 'नेमबाजीचे लक्ष्य' यासारखे दिसतात. या डागांभोवती ठळक पिवळी प्रभावळ असते. जसा रोग वाढतो, तसे पूर्ण पान पिवळे पडुन गळते, ज्यामुळे चांगलीच पानगळ होते. जेव्हा पाने वाळून गळतात तेव्हा फ़ळे उन्हाने भाजण्यास धार्जिणी होतात. तसेच डाग स्पष्ट केंद्रासह फांद्या आणि फळांवर येतात. फळे कुजण्यास सुरवात होते व शेवटी त्यांची गळ होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलीस किंवा कॉपरवर आधारीत बुरशीनाशके ज्यांना सेंद्रिय म्हणुन वर्गीकृत केले आहे, ते ही ह्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लवकर येणाऱ्या करप्याचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक बुरशीनाशक बाजारात उपलब्ध आहेत. अॅझॉक्सिस्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन, डायफेनोकोनेझॉल, बॉस्कॅलिड, क्लोरोथॅलोनिल, फेनामायडन, मॅनेब, मँकोझेब, पायराक्लोस्ट्रोबिन, ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन आणि झायरमवर आधारीत किंवा यांच्या मिश्रणाची बुरशीनाशके वापरली जाऊ शकतात. विविध रसायनिक मिश्रणांचा वापर करण्याची शिफारस करण्यात येते. उपचार वेळेत करा व ते करताना हवामान परिस्थिती विचारात घ्या. या उत्पादनांचा वापर केल्यानंतर आपण सुरक्षितपणे किती दिवसानंतर काढणी करू शकता याची काळजीपूर्वक तपासाणी करा.

कशामुळे झाले

अल्टरनेरिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी जमिनीतील संक्रमित पिकाच्या अवशेषात किंवा पर्यायी यजमानात विश्रांती घेते. खरेदी केलेली बियाणे किंवा रोपेही आधीच संक्रमित असु शकतात. ऊबदार तापमान (२४-२९अंश) आणि जास्त आर्द्रता (९०%) या रोगास अनुकूल आहे. खूप जास्त कालावधीचे ओला काळ (किंवा ओल्या पाठोपाठ कोरड्य हवामानाचा चक्र) बीजाणूच्या उत्पादनास प्रोत्साहन देते, ज्यांचा प्रसार वारा, पावसाचे उडणारे थेंब किंवा सिंचनाद्वारे होतो. अपरिपक्व किंवा ओल्या हवामानात काढलेली कंद या रोगाच्या संक्रमणास खासकरुन जास्त संवेदनशील असतात. हे रोग बर्‍याचदा जोरदार पावसानंतर येते आणि उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात विशेषतः नुकसानकारक असतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित जंतुमुक्त बियाणे किंवा रोप घ्या.
  • या रोगास प्रतिकारक वाण शोधा.
  • पेरणी किंवा रोपणी पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी उंच गादीवाफ्यात करा.
  • वार्‍याच्या मुख्य दिशेने आणि सावलीचे भाग टाळुन वाफे तयार करा.
  • पाऊस किंवा सिंचनानंतर झाडी लवकर वाळण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • झाडाचे भाग जमिनीशी संपर्क टाळण्यासाठी अच्छादन करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे खास करुन ओल्या हवामानात निरीक्षण करा.
  • जमिनीलगटचे पान काढा.
  • लक्षणे दर्शविणारी पाने काढुन नष्ट करा.
  • झाडांना पुरेसे पोषण देऊन मजबुत आणि जोमदार ठेवा.
  • झाडांना ताठ उभे ठेवण्यासाठी तार बांबूने आधार द्या.
  • पाने जास्त ओले होणे टाळण्यासाठी ठिबक सिंचन करा.
  • झाडांना सकाळी पाणी द्या जेणेकरून संपूर्ण दिवस झाडी कोरडी राहील.
  • शेतातील आणि आजुबाजुचे संवेदनशील तण काढुन टाका.
  • झाडे ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका व (शेणखत तयार करण्यासाठी वापरु नका) अवशेषांना खोल नांगरुन (४५ सेंमी.
  • पेक्षा जास्त खोल) गाडुन टाका.
  • २-३ वर्षांसाठी संवेदनशील नसलेल्या पिकांसह फेरपालट करा.
  • कंदांना थंड तापमानात आणि हवा चांगली खेळती असणार्‍या ठिकाणी साठवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा