Gibberella fujikuroi
बुरशी
हवामान परिस्थितीप्रमाणे लक्षणे आणि रोगाची गंभीरता बदलु शकते. संक्रमित झाड त्यांच्या अनैसर्गिक उंचीमुळे म्हणजे खूप उंच किंवा खुजी आणि फिकट दिसण्याने लवकर सापडतात. बियाणांवर व्रण, कूज आणि विकृतता दिसते. खोडांची साल रंगहीन होते आणि त्यावर बुरशीची वाढ दिसते, एकुणच वाढ खुंटलेली किंवा जास्तच जोमाने झालेली दिसते. पानेही अनैसर्गिक रंगाची असुन त्यावरही बुरशीची वाढ दिसुन येते. ओंबीवर काळे किंवा तपकिरी डाग, खपल्या आणि कणसांची कूज दिसुन येते. संपूर्ण झाडाची मर, अकाली वृद्धत्व आणि रोपांवर करपा दिसतो.
या जंतुंचे वहन करणार्या किड्यांचे नियंत्रण करण्यासाठी नीम अर्काची फवारणी करा. ट्रायकोडर्मा प्रजातीसारखे जैविक नियंत्रक वापरुन जंतुंचे नियंत्रण करा. खोडकुजचे नियंत्रण स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स वापरुन देखील प्रभावीपणे करता येते. हे दोन्ही घटक बीजोपचार तसेच जमिनीवरील वापर म्हणुनही वापरता येतात. २५० किलों शेणखत टाका.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँकोझेब ५०% आणि कार्बेंडाझिम २५% ची बीजप्रक्रिया करा.
गिबेरेला फ्युजिकुरोइ नावाच्या जमिनीजन्य बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. जंतुंचे बीजाणू वार्याने आणि पावसाने पसरतात आणि मक्याच्या कणसांवरील जखमांतुन आत शिरतात. बियाणे उगवल्यापासुन तुरे येई पर्यंत केव्हाही प्रदुर्भाव होऊ शकतो पण लक्षणे मात्र फार उशीराच्या टप्प्यावर दिसतात. ही बियाणांवर, पिकांच्या अवशेषात किंवा गवतांसारख्या पर्याय़ी यजमानात जगते. हिचा प्रसार बीजाणूंनी रेशमी केस, मूळ आणि खोडातुन केलेल्या संक्रमणाद्वारे होते. किड्यांनी कणसावर खाण्यासाठी केलेल्या जखमातुन प्रामुख्याने ही आत शिरते. तिथेच ती उगते आणि आत शिरल्या जागेपासुन ते पूर्ण कणसात घर करते. वैकल्पिकरीत्या ती झाडाच्या मुळातुन आत शिरते आणि झाडातुन व्यवस्थित वाढत-वाढत वर चढते. झाडांना अनेक प्रकारच्या हवामान परिस्थितींतुन (ताणांमुळे) लागण होऊ शकते पण लक्षणे विशेषकरुन ऊबदार (२६-२८ अंश) तापमानात आणि आर्द्र हवामानात आणि जेव्हा झाड फुलोर्याच्या टप्प्यावर पोचतात तेव्हा खास गंभीर होतात.