Alternaria triticina
बुरशी
कोवळी रोपे जंतुंचा प्रतिकार करतात. खालच्या पानांवरच प्रथम संक्रमणाची चिन्हे दिसतात, जी हळुहळु वरच्या पानांपर्यंत पसरतात. बारीक, लंबगोलाकार, पिवळ्या डागांनी संक्रमणाची सुरवात होते जे अनियमतपणे खालच्या पानांवर विखुरलेले असतात व नंतर हळुहळु वरच्या पानांवर देखील दिसु लागतात. कालांतराने डाग मोठे होऊन बेढब आकाराचे, गडद तपकिरी किंवा राखाडी खोलगट होतात. डागांना कदाचित ठळक पिवळी किनार असु शकते आणि हे डाग १ सें.मी. किंवा जास्त व्यासाचे होऊ शकतात. आर्द्र परिस्थितीत, डागांवर काळ्या भुकटीतील बुरशीचे बीजाणू असतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, डाग एकमेकात मिसळतात आणि परिणामी पूर्ण पान वाळते. गंभीर संक्रमणात पर्णकोष, कूस आणि खालचे पानेही प्रभावित होतात आणि करपल्यासारखी दिसतात.
बियाणेजन्य संक्रमणाचे नियंत्रण व्हिटावॅक्स २.५ ग्राम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करुन केले जाऊ शकते. ट्रायकोडर्मा व्हिरिडे आणि व्हिटावॅक्स पुढील संक्रमण प्रभावीकारकपणे (९८.४%) रोखतात. पहिल्या आणि दुसर्या फवारणीत झायनेब मध्ये २-३% युरिया मिसळा. नीमच्या पानांचा अर्क पाण्यासारखा करुन वापरा. बुरशीनाशक आणि गरम पाण्याचे उपचार केल्यास बियाणेजन्य संक्रमण मरतात. ट्रायकोडर्मा व्हिरिडे (२%) आणि टी. हरझियानम (२%), अॅस्पर्जीलस ह्युमिकोला आणि बॅसिलस सबटिलिस सारख्या जंतुंचा वापर रोगाची साथ आणखीन वाढु नये म्हणुन केला जातो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ए. ट्रिटिसिनाचे नियंत्रण बुरशीनाशकांनी केल्यास रोगाच्या गंभीरतेत ७५% घट दिसुन येते आणि रोपांचे उत्पादन वाढलेले दिसते. मँकोझेब, झायराम, झिनेब (०.२%), थायराम, फायटोलान, प्रोपिनेब, क्लोरोथालोनिल आणि नाबम, प्रोपिकोनॅझोल (०.१५%) टेब्युकोनाझोल आणि हेक्झाकोनाझोल (०.५%) सारखी बुरशीनाशके वापरा. मँकोझेबची सहनशीलता निर्माण होऊ नये म्हणुन बुरशीनाशकांना संयुक्तपणे वापरा.
अल्टरनेरिया ट्रिटिसिना नावाच्या बुरशीमुळे नुकसान होते. संक्रमण मातीजन्य आणि बियाणेजन्यही आहे आणि प्रसार वार्याने होते. संक्रमित बिया निरोगी बियांपेक्षा लहान असतात आणि बहुधा सुरकुतलेल्या आणि तपकिरी रंगहीनतेसह असतात. संक्रमित जमिनीत लागवड झाल्यावर किंवा संक्रमित पीकाच्या अवशेषांच्या संपर्कात असल्यास (उदा. पावसाच्या उडणार्या पाण्याने किंवा थेट संपर्कात आली) तर प्रभावित होतात. अहवालानुसार बुरशी उन्हाळ्यात दोन महिन्यांपर्यंत जमिनीवरील संक्रमित कचर्यात जगते पण गाडलेल्या कचर्यात ४ महिन्यांपर्यंत जगते. रोपाच्या वयानुसार संवेदनशीलता वाढते कारण ए. ट्रायटिसिना सुमारे चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या गव्हाच्या रोपट्यांना लागण करण्यास असमर्थ असते. रोपे सुमारे ७ अठवड्याची होईपर्यंत लक्षणे दृष्य होत नाहीत. २०-२५ अंश तापमान संक्रमणास आणि रोगाच्या विकासास इष्टतम असते. गंभीर परिस्थितीत उत्पन्नाचे ८०% पेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.