लिंबूवर्गीय

आंबलेली कूज (सावर रॉट)

Geotrichum candidum

बुरशी

थोडक्यात

  • फळे मऊ, पाणचट, तपकिरी रंगाची सडतात.
  • व्हिनेगरसारखा आंबट वास येतो.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

कूजु लागणार्‍या फळात गव्हाळ ते क्वचित लालसर रंगहीनता दिसुन येते. पांढर्‍या वाणाची फळे गव्हाळ किंवा तपकिरी होतात तर जांभळ्या वाणांची फळे जांभळी किंवा गुलाबी होतात. फळ माशा आणि फळ माशांच्या अळ्या बहुधा मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आंबट कूजीची सुरवातीची लक्षणे ही हिरव्या किंवा निळ्या बुरशीसारखीच दिसतात. बुरशी साल, आतील भागातील भिंत तसेच रसवाहक नलिकांना चिकट पाणचट पदार्थांत बदलते. उच्च सापेक्ष आर्द्रतेत व्रणांवर बुडबुड्यांची बुरशी आणि काही वेळेस पांढर्‍या किंवा दुधाळ रंगाच्या मायसेलियमचे सुरकुतलेले थर आच्छादिलेले दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पेरॉक्साइडेस (पीओडी)यीस्ट आणि सुपेरॉक्साइड डायम्युटेस (एसओडी) सारख्या प्रतिजैविकांचा वापर करुन आंबट कूजीचा विकास नियंत्रित करावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि पोटॅशियम मेटाबायसल्फेटसारख्या सामान्य अँटिमायक्रोबियल्स (प्रतिजैविके)चा वापर करावा. ड्रोसोफिला माशांविरुद्ध प्रतिजैविकांचा वापर बहुधा कीटनाशक उपचारांसह केल्यास जास्त प्रभावी असतो. गुझ्झाटाइन बुरशीनाशकांचा वापर तोड्यानंतर २४ तासात करावा.

कशामुळे झाले

नैसर्गिकरीत्या लागण होणार्‍या बुरशीमुळे नुकसान उद्भवते. यांत्रिक किंवा पक्षांनी वा किड्यांनी खाण्यामुळे, साल तडकल्याने किंवा व्रणांमुळे फळांना झालेल्या जखमांतुन बहुधा जंतु शिरकाव करतात ज्यातुन पावडरी मिल्ड्यूची लागण होते. फार दाटी आणि पातळ सालीच्या वाणे जास्त संवेदनशील होतात. उबदार आर्द्र हवामान आणि फळातील गोडव्यामुळे फळमाशा त्यावर शेकडोंनी अंडी घालतात. जंतु बहुधा मातीत असतात आणि वार्‍याने किंवा उडणार्‍या पाण्याच्या थेंबांबरोबर झाडीतील फळांच्या पृष्ठभागावर पडतात. जसे फळ पक्व होत जाते तसे ते आंबट कूजीच्या संसर्गास धार्जिणे होत जाते. रोगाची वाढ ही उच्च आर्द्रता आणि १० अंश सेल्शियसवरील तापमान यावर अवलंबुन असते पण इष्टतम तापमान २५-३० अंश सेल्शियस अहे. आंबट कूजीच्या प्रगत टप्प्यांशी संबंधित आंबट वासामुळे माशा (ड्रोसोफिला प्रजाती) आकर्षित होतात ज्या बुरशीचा प्रसार करतात आणि अन्य जखमी फळांनाही संसर्गित करतात. आंबट कूजीचे बीजाणू जमिनीतील सातत्याने साचणार्‍या पाण्याच्या खोलगट भाग किंवा खंदकासारख्या पाणथळ जागी गोळा होतात.


प्रतिबंधक उपाय

  • वाढीच्या समस्यांशी संबंधित नुकसान फळांना होते ज्याचा प्रतिबंध झाडी व्यवस्थापनाने, वेचक फळे ठेवण्याने आणि पाणी व्यवस्थापनाने करता येतो.
  • नुकसान कमी करण्यासाठी आपल्या रोपांची खूप काळजी घ्या.
  • वॅस्पची घरटी काढा आणि सापळे वापरा.
  • पक्षांच्या येण्याने होणार्‍या नुकसानाचा प्रतिबंध करा.
  • पावसाळ्यापूर्वीच तोडा करा ज्यामुळे आंबट कुजीमुळे होणारे नुकसान कमी करता येईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा