कापूस

मायरोथेशियम पानांवरील डाग

Myrothecium roridum

बुरशी

थोडक्यात

  • खोड आणि शेंडा कूज.
  • पानांवर फिकट तपकिरी ते काळे डाग कडांजवळ येतात.
  • डागांचे केंद्र गळते आणि बंदुकीची गोळी मारल्यासारखे भोक पानांवर रहाते.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

लक्षणांची वैशिष्ट्ये आहेत खोड आणि शेंड्याची कूज आणि पानांवर केंद्रीत तपकिरी डाग. जास्त आर्द्रतेत, काळ्या उंचावलेल्या रचना आणि पांढरे केस ह्या डागात ऊगवतात ज्यामुळे ते विशिष्ट दिसते. बागायत पिकात, लक्षणे बहुधा शेंड्यावर आणि बाजुच्या पर्णकोषांवरील तपकिरी काळ्या कुजीने सुरु होतात. जसे डाग खोडासभोवताली वाढतात, छोटे पांढरे केस बाधीत भागात ऊगवतात. छोटे अनियमित तपकिरी ते काळे डाग पानांवर येतात. हे डाग हळुहळु जास्त गोलाकार होतात आणि त्यांचे केंद्र स्पष्ट वर्तुळाकार असते. नंतर जुने डाग एकमेकात मिसळतात आणि सूक्ष्म पांढर्‍या डागांनी भरतात. जसे ते सुकतात तसे ह्या डागांचे केंद्र कागदी आणि पांढुरके होऊन अखेरीस गळते, ज्यामुळे बंदुकीची गोळी मारल्यासारखे भोक पानांवर दिसते. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर पूर्ण रोपच कोलमडु शकते पण फळे क्वचितच बाधीत होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या दिवसापर्यंत मायरोथेशियम पानांवरील डागांविरुद्ध कोणताही जैव उपचार माहितीत नाही. जर आपणांस ह्या बुरशीवरील उपचाराची कोणतीही पद्धत माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पहिले लक्षण दिसताच, मँकोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २ कि. प्रति हेक्टर फवारा आणि १५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा परत उपचार करा. जर मोसमात उशीरा संक्रमण झाले तर काढणीपूर्वचा अंतराल लक्षात ठेवण्याची काळजी घ्या.

कशामुळे झाले

मायरोथेशियम रोरिडम नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात, जिचे जंतु आर्थिकरीत्या महत्वाच्या पिकांच्या आणि शोभेच्या झाडांच्या खोडाची आणि शेंड्याची कूज करतात. रोगाचा प्रसार खूप प्रकारांनी होऊ शकतो, उदा. रोपणीच्या वेळी वाईट पद्धती वापरल्यास, फवारा सिंचन, यांत्रिक किंवा किड्यांच्या जखमा. जखमी झालेले भाग हे बुरशीच्या जंतुना आत शिरुन रोपाला संक्रमित करण्याचे द्वार होते. रोगाच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता हे दोन्ही ऊबदार, ओल्या हवेत आणि जास्त आर्द्रता असल्यास वाढतात. जास्त खते दिल्यानेही झाडी दाट होते ज्यामुळेही ह्या रोगाचा उद्रेक होऊ शकतो. अखेरीस रोग


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण निवडा.
  • जास्त खते एका वेळी देणे टाळा आणि मोसमात खत विभागुन द्या.
  • शेतात काम करताना रोपाला ईजा होणे टाळा.
  • सिंचनाची वेळ साधुन पाने जास्त काळ ओली रहाणार नाहीत हे पहा.
  • शेतकामानंतर सगळी उपकरणे आणि हत्यारे साफ करुन निर्जंतुक करण्याची काळजी घ्या.
  • उत्पादाची बांधणी करताना खास काळजी घ्या कारण ह्यामुळे उत्पादाला जखमा होऊ शकतात.
  • संक्रमित रोपांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • एकच पीक लावणे टाळा कारण ह्यामुळे रोगाचा प्रसार चांगला होतो.
  • चांगला सामू मिळण्यासाठी शेतात लाईम करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा