मका

मक्यावरील केवडा

Peronosclerospora sorghi

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर पिवळे पट्टे येतात.
  • वाढ खुंटलेली आणि झुडुपासारखी होते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

पानांच्या वरील आणि खालील दोन्ही बाजुंवर पांढर्‍या बुरशीची वाढ दिसते. पेरे छोटे आल्याने झाडाची वाढ खुंटुन ते झुडपासारखे दिसते. तुऱ्यातील न उमललेल्या नर फुलांच्या देठावरही केवड्याची वाढ दिसते. तुऱ्यात बारीक तसेच मोठी पानेही दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

प्रतिकारक आणि संकरीत वाण लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सक्रिय मेटालॅक्झिल आणि मँकोझेब असणार्‍या आंतरप्रवाही बुरशीनाशकांनी बीजोपचार करा.

कशामुळे झाले

बुरशीमुळे नुकसान उद्भवते जी पानांच्या दोन्ही बाजुंवर पांढर्‍या केवड्याच्या रुपात दिसते. हिच्या संक्रमणाचा प्राथमिक स्त्रोत जमिनीतील जन्मलेल्या बुरशीच्या बीजाणूंमुळे होतो जे मक्याच्या संक्रमित बियाणात सूप्तावस्थेतील मायसेलियममध्ये असतात. बुरशीने एकदा का यजमान भागांना संक्रमित केले कि मग पानांवरील सूक्ष्म बीजाणूतुन स्पोरांगी बीजाणू उद्भवतात आणि वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने दुय्यम संक्रमण घडवितात.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ लागवड पद्धत वापरा.
  • जमिन चांगली खोल नांगरा.
  • कडधान्यासह पीक फेरपालट करा.
  • संक्रमित झाड काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा