Choanephora cucurbitarum
बुरशी
फुल, कळ्या किंवा शेंडे गडद होऊन मरगळणे (फुलोर्यावरील करपा) ही सुरुवातीच्या लक्षणांची वैशिष्ट्ये आहेत. रोगाचा प्रसार वरुन खाली होतो व पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात ज्यामुळे त्यांना रुपेरी छटा प्राप्त होते. जुने डाग करपतात आणि वाळल्यासारखे दिसतात ज्यामुळे पानाचा टोक आणि कडा करपतात. फांद्यांवर कुजीची लक्षणे, तपकिरी ते काळ्या चट्ट्यात दिसतात आणि मर होते. अखेरीस संपूर्ण झाडाची मर होते. काळी मऊ कूज कोवळ्या फळांवर बहुधा बुडाकडील भागात विकसित होते. जवळुन निरीक्षण केल्यास रुपेरी, केसासारखी वाढ संक्रमित भागात दिसते. झाडांमध्ये लक्षणे फायटोप्थोरा करप्यासारखी दिसतात.
या रोगावर चांगले असे जैविक उपाय नाहीत. बेनिनमध्ये बॅसिलस सबटिलिस जिवाणूला त्याच्या विरोधक प्रभाव चाचणीसाठी चोनेफोरा कुकुरबिटॅरमविरुद्ध सकारात्मपणे वापरण्यात आले आहे. तथापि मिरचीवर याची चाचणी अजुनतरी करण्यात आलेली नाही.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगावर कोणतेही बुरशीनाशक नसल्याने प्रतिबंध करणे हाच मंत्र आहे. बुरशीनाशकांचा वापर करुन लक्षणे कमी होण्यात मदत होऊ शकते पण हे व्यवहार्य नाही कारण झाडाला सातत्याने फुले येत असतात आणि म्हणुन या जंतुला संवेदनशील असतात.
चोनेफोरा कुकुरबिटॅरम नावाच्या संधीसाधु बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी मुख्यतः किडी किंवा शेतकामादरम्यान झालेल्या जखमांद्वारे आत प्रवेश करते. तिचे बीजाणू वारा, उडणार्या पाण्याचे थेंब, कपडे आणि शेतकामाच्या उपकरणांद्वारे पसरतात. रोगाचा उद्रेक बहुधा जास्त लांबलेला पावसाळी काळ, जास्त आर्द्रता आणि जास्त तापमान असताना होतो. म्हणुनच उष्ण कटिबंधीय हवामानात पावसाळ्यात लागवड केलेल्या मिरचीचा सर्वात मोठा नुकसान होतो. या परिस्थितीशी जास्त जुळवुन न घेतलेली पिके जास्त संवेदनशील असतात. फायटोप्थोरा करप्यापासुन वेगळा ओळखण्यासाठी (शक्य तो सकाळी) प्रभावित भागात राखाडीसर केस दिसतायत का ते निरीक्षण करा.