Leveillula taurica
बुरशी
लेविल्युला बहुधा पानांनाच प्रभावित करते तर खोड आणि फळे क्वचितच संक्रमित होतात. पानांच्या खालच्या बाजुला पांढुरके ठिपके आणि वरच्या बाजुला विविध तीव्रतेचे पिवळे ठिपके दिसणे ही पहिली लक्षणे आहेत. नंतर पांढुरके भुकटीचे ठिपकेही वरच्या बाजुला येऊ शकतात. जसा रोग वाढत जातो, तसे संक्रमित भाग आक्रसतात, पाने गळतात आणि रोपाची मर होऊ शकते.
बागेसाठी, दूध-पाण्याचे द्रावण नैसर्गिक बुरशीनाशकाचे काम करते. ह्या द्रावणाला पानांवर दर दुसर्या दिवशी शिंपडा. भूरीचे प्रकार यजमानाप्रमाणे बदलतात आणि सगळ्याच प्रकारांसाठी हे द्रावण काम करणार नाही. जर काही सुधारणा आढळुन आली नाही तर लसुन किंवा सोडियम बायकार्बोनेटचे द्रावण वापरुन पहा. बाजारात जैव उपचारही उपलब्ध आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. भूरीला संवेदनशील असलेली पिके पाहता, कोणत्याही खास रसायनिक उपचारांची शिफारस करणे कठिण आहे. विरघळणारे गंधक, ट्रिफ्ल्युमिझोल, मायक्लोब्युटानिल, नीमवर आधारीत बुरशीनाशके वापरुन काही पिकात बुरशीची वाढ नियंत्रित करता येते.
न उमललेल्या पानांत आणि रोपाच्या इतर कचर्यात बुरशीचे बीजाणू रहातात. वारा, पाणी आणि किडे बीजाणूंचे वहन जवळच्या रोपांवर करतात. जरी ही बुरशी असली तरी भूरी कोरड्या हवामानातही नेहमीसारखीच विकसित होते. ती १०-१२ अंश तापमानात जगु शकते पण ३० अंश तापमानात फोफावते. भूरीच्या विरुद्ध थोडा पाऊस आणि नियमितपणे सकाळी पडणारे दव भूरीचा प्रसार चांगला फ़ैलावतात.