Stemphylium solani
बुरशी
पानांवरील राखाडी ठिपके सुमारे २ सें.मी. व्यासाचे, गोलाकार आणि जांभळ्या कडा असलेले असतात. जसे ते पक्व होतात, ते केंद्रीत नक्षी तयार करतात आणि पांढरे केंद्र या ठिपक्यात विकसित होते, जे नंतर फाटते आणि गळते ज्यामुळे "बंदुकीने गोळी मारल्यासारखे" दिसते. ठिपके बहुधा झाडीतील वरच्या पानांत येतात आणि पानांच्या कडांपासुन सुरु होऊन मध्याकडे वाढतात. झाडाची वरची पाने फुलोऱ्याच्या उशिराच्या टप्प्यात संक्रमणास जास्त संवेदनशील असतात कारण पोषकांची सर्वात जास्त गरज याच काळात भासते. जर वेळेत शोधुन पालाशाने उपाय केल्यास हा रोग दुय्यम असतो. जर उपचार न करता तसेच सोडले तर मोठ्या प्रमाणात अकाली पानगळ होते आणि उत्पादनात मोठी घट होते.
आज पर्यंत तरी कोणतेही जैविक नियंत्रण उपाय या रोगाविरुद्ध माहितीत नाही. याला टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय वापरावेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगाचा उपचार करण्यासाठी बुरशीनाशक उपलब्ध आहेत (पायराक्लोस्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन+मेटकोनाझोल) परंतु सामान्यतः त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले नाही कारण ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत.
स्टेमफायलम सोलानी नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. हिच्या घटना आणि रोगाचा विकास याला उच्च आर्द्रता, वारंवार पाऊस आणि जास्त लांबलेला दुष्काळही अनुकूल असतो. भौतिक किंवा पोषकांचा ताणसुद्धा खास करुन फुल किंवा बोंड धारणेच्या काळात महत्वाचा घटक आहे. पलाशाची कमतरता हा मुख्य घटक आहे पण त्याबरोबर दुष्काळ, किड्यांचा प्रमाण किंवा जमिनीत सूत्रकृमी असणे हे ही होऊ शकते. या बुरशीच्या बीजाणूंचा प्रसार इतर झाडांवर करण्यासाठी वारा देखील मदत करतो. २०-३० अंश सेल्शियसचे तापमान या रोगाच्या वाढीस अनुकूल आहे. एकाच शेतात ही बुरशी, जिनेरा अल्टरनेरिया आणि सर्कोस्पोरा बु्रशीबरोबर संयुक्तपणे रोग तयार करताना पाहिली गेली आहेत. कापूस, टोमॅटो, बटाटे, वांगी आणि कांदे पर्यायी यजमानात येतात.