Corynespora cassiicola
बुरशी
लक्षणे प्रथमत: मोसमाच्या सुरवातीस खालील पानांवर दिसतात. नंतर मग लागवडीनंतर एकाच महिन्यात पूर्ण झाडावर हे ठिपके पसरतात. सुरवातीला हे अनेक ठिपके छोट्या गडद लाल ठिपक्यांचे असतात जे नंतर तपकिरी होऊन त्यांच्या कडा गडद होतात पण त्यांच्या पानांचा हिरवा किंवा हिरवट पिवळा रंग मात्र राखुन असतात. बोंडांच्या कळ्यांवरही व्रण दिसतात आणि कदाचित बोंडांवरही दिसु शकतात. जस-जसे हे डाग जुने होतात त्यासभोवती फिकट आणि गडद तपकिरी वर्तुळे येतात. ह्यामुळे ३० ते ४०% अकाली पानगळीमुळे उत्पादनात घट येते. गंभीररीत्या संक्रमित बोंडाची प्रतही कमी भरते आणि बियाणेही संक्रमित असते.
बॅसिलस थुरिंगिएनसिसने कपाशीवरील कोरिनेस्पोरा पानांवरील ठिपके यया रोगाचा जैविक नियंत्रण करण्याची संभावितता दर्शविली आहे.
कार्बेंडाझिम आणि कॉपर सारख्या बुरशीनाशकांची उत्पादने फुलधारणेच्या पहिल्या ते सहाव्या अठवड्यांपर्यंत वापरली जावीत. शिफारस अशी आहे कि फुलधारणेच्या १ल्या किंवा ३र्या अठवड्यात बुरशीनाशक वापराची सुरवात करुन, फुलधारणेपासुन ३र्या वा ५व्या अठवड्या गरज भासल्यास परत वापर करावा. किंवा रोगाचे पहिले चिन्ह दिसताच बुरशीनाशकांचा वापर करावा आणि गरज भासल्यास दुसर्यांदाही वापर करावा. दुसरा पर्याय म्हणजे पानगळीचे पहिले चिन्ह दिसताच, बुरशीनाशक वापरावे आणि गरज भासल्यास दुसर्यांदाही वापर करावा. तरीही पण जर झाडांची अकाली पानगळ होऊन जर २५-३०%च पाने उरली असतील तर ह्या रोगाचे नियंत्रण बुरशीनाशकांचा वापर करुन करणे अत्यंत कठिण आहे.
२५ ते ३० अंशाचे मध्यम तापमान, जास्त आर्द्रता, आणि वारंवार पावसाने पाने जास्त काळ ओली रहाणे, भरपूर दव किंवा धुक्यामुळे संक्रमण आणि प्रसार वाढतो. सिंचित, चांगले उत्पादन देणार्या चांगल्या वाढत्या कपाशीत हे संक्रमण जास्त गंभीर असते.