Alternaria padwickii
बुरशी
पानांवर आणि पक्व होणार्या दाण्यांवर लक्षणे दिसतात. मुळांवर किंवा सुरुवातीला येणार्या पानांवर बारीक गडद डाग दिसतात. डागांच्या वरील रोपाचा भाग करपतो आणि वाळतो. पानांवर गडद तपकिरी कडांचे गोलाकार ते लंबगोलाकार (३-१० मि.मी. व्यासाचे) डाग येतात. या मोठ्या डागाच्या मध्यभागी बहुधा तपकिरी किंवा पांढरे ठिपके दिसतात. साळी आक्रसलेली आणि ठिसुळ होते. संक्रमित दाणे बहुधा गडद रंगाचे, खडुसारखे, ठिसुळ आणि आक्रसलेले असतात तसेच उगवण क्षमता कमी भरते. पर्णकोषावर लालसर तपकिरी ठिपके उमटतात. साळी आक्रसलेली आणि ठिसुळ असते.
थायरम, कॅप्टन किंवा मँकोझेब २ ग्रा. / किलो चे बीजोपचार करा. उगवण क्षमता वाढवण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी बियाणांवर ५४ अंश गरम पाण्याचे उपचार १५ मिनिटे करा. भाताचे धसकट व तनीस शेतात जाळा. रोपांच्या सभोवताली बुरशीची वाढ नियंत्रित करण्यासाठी स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स जिवाणूंची पावडर ५ ते १० ग्राम प्रति किलो याप्रमाणे वापरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब, कार्बॉक्सिन, पॉलिऑक्सिन आणि आयप्रोबेनफॉस बुरशीनाशकांच्या फवारण्या दाण्यांच्या रंगहीनतेच्या नियंत्रणासाठी करा.
हा रोग टी.पॅडविकि या बियाणेजन्य बुरशी, एक अलैंगिक-पुनरुत्पादक बुरशी, जी भाताच्या दाण्यांना संक्रमित करते. हे बियाणे रंगहीनता, धान्य कुज व रोपात करपा निर्माण करते. हिच्या घटना प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागात नोंदविलेल्या आहेत. आर्द्रता आणि उच्च तापमान बुरशीच्या वाढीस अनुरुप आहेत. बुरशी स्क्लेरोशिया म्हणुन रोपांच्या अवशेषात आणि जमिनीत रहाते.