मसूर

मसुरीवरील स्टेमफिलियम करपा

Pleospora herbarum

बुरशी

थोडक्यात

  • छोटे, फिकट तपकिरी डाग पानांवर येतात जे मोठे होऊन एकमेकात मिसळुन पूर्ण फांदीलाच वेढतात.
  • जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास रोगट पाने राखाडी किंवा काळी दिसतात.
  • रोपे काही दिवसातच पर्णहीन होऊ शकतात.
  • दूरवरुन पाहिल्यास बेढब तपकिरी भाग शेतात दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मसूर

मसूर

लक्षणे

स्टेमफिलियम करप्याची सुरवात पानांवरील छोट्या, फिकट तपकिरी डागांनी होते. ही लक्षणे बोरट्रिस करप्यासारखीच असतात. शेवटी हे डाग मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि मोठा, बेढब डाग बनतो ज्याने पूर्ण फांदी वेढली जाते. क्लोरोटिक ते गव्हाळ रंगाची पाने खासकरुन झाडीच्या वरच्या बाजुला स्पष्ट दिसतात. सुरवातीला फांद्या हिरव्या रहातात पण जसा रोग आणखीन वाढत जातो तशा त्या गव्हाळ रंगाच्या होऊन नंतर तपकिरी होतात. जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास, रोगट पाने राखाडी किंवा काळी पडतात. जशी ती पाने गळुन जमिनीवर पडतात, ती भविष्यातील पिढीचा स्त्रोत बनतात. बहुतेक वेळा रोपांची फुटव्यांची पाने सोडुन पूर्ण पानगळ काही दिवसातच होऊ शकते. दूरवरुन पाहिल्यास बेढब तपकिरी भाग शेतात पाहिले जाऊ शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

अॅझाडिराच्टा इंडिका (नीम) चा अॅक्वेयस अर्क आणि धतुरा स्टामोनियम (जिमसोनवीड) चा वापर स्टेमफिलियम पानावरील करपा रोगासाठी प्रभावीरीत्या पारंपारिक बुरशीनाशकांच्या परिणामाच्या जवळपास इतका, केला जाऊ शकतो. हरितगृहांच्या वातावरणात, रोगाच्या घटना आणि गंभीरता कमी (सुमारे ७०% दोन्ही बाबतीत) करण्यासाठी ट्रिकोडर्मा हरझियानम आणि स्टॅचिबोट्रिस चारटारम वर आधारीत उत्पादांचा प्रतिबंधक किंवा उपचारक वापर केला गेला आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मसुरीवरील स्टेमफिलियम करप्याविरुद्ध परिणामकारक होण्यासाठी, बुरशीनाशकांचा वापर प्रतिबंधक म्हणुन वाढीच्या मोसमाच्या शेवटच्या तिसर्‍या भागात केला गेला पाहिजे. जर उपचार आधी केले गेले तर त्याचा काहीच परिणाम मिळणार नाही. अॅझोक्सिस्ट्रोबिन + दिफेनोकोनाझोल, बोस्कालिड + पायराक्लोस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल, आयप्रोडियॉन, मँकोझेब आणि प्रोक्लोराज सारखे सक्रिय घटक असणारी द्रावणे चांगले काम करतात. बुरशीला परिस्थिती अनुकूल नसते (थंड आणि कोरडे हवामान) तेव्हाच उपचार केले गेले पाहिजेत. एकुण काय तर बु्रशीनाशकांचा परिणाम उत्पाद बदलण्याने वाढतो.

कशामुळे झाले

प्लेयोस्पोरा हरबारम नावाच्या बुरशीमुळे मसुरीवर स्टेमफिलियम करपा होतो, ज्याला पूर्वी स्टेमफिलियम हरबारम म्हटले जात असे, म्हणुन रोगाचे हे सामान्य नाव पडले आहे. ही बुरशी बियाणात किंवा शेतातील संक्रमित रोपाच्या मृत कचर्‍यात रहाते असे समजले जाते. मसुरीव्यतिरिक्त ही बुरशी मोठ्या पानांच्या विस्तृत श्रेणीला संक्रमित करते. हंगामात उशीरा पाने फार काळ ओली रहाणे हे रोगाच्या विकासाला गरजेचे आहे. ह्याच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता ही तापमानावरही बरीचशी अवलंबुन आहे, त्यातही २२-३० अंशाचे तापमान चांगलेच मानवते. ह्या परिस्थितीत जर पाने ८ ते १२ तास ओली राहीली तर संक्रमण सुरु होण्यास पुरेसे आहे. थोड्या कमी मानवणार्‍या परिस्थितीत , उदा. हवेचे तापमान १५-२० अंश असेल तर पाने ओली रहाण्याचा काळ वाढला पाहिजे (२४ तास किंवा जास्त). जुनी रोपे कोवळ्या रोपांपेक्षा ह्या रोगास जास्त संवेदनशील असतात, खासकरुन जर ती नत्राच्या ताणाखाली असली तर.


प्रतिबंधक उपाय

  • साफ बियाणेच निवडा, शक्य असल्यास प्रमाणित स्त्रोताकडुनच घ्या.
  • प्रतिकारक वाण (पुष्कळशी उपलब्ध आहेत) लावा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी रोपांची दाटी कमी करा.
  • रोपणी करण्यापूर्वी शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होतो आहे ह्याची काळजी घ्या.
  • नत्राचा अतिरेकी वापर टाळा कारण ह्यामुळे रोगाची गंभीरता वाढते.
  • काढणीनंतर रोपांचे अवशेष खणुन काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा