कांदा

कांद्यावरील जांभळे धब्बे

Alternaria porri

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांवर आणि फुलांच्या फांद्यांवर छोटे, बेढब, खोलगट आणि पांढुरके ठिपके येतात.
  • जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास हे ठिपके लंबवर्तुळाकार तपकिरी किंवा जांभळ्या धब्ब्यात बदलतात आणि त्यांची केंद्रे फिकट आणि गडद भागांचे केंद्रित भाग असलेली असतात.
  • फुले किंवा फुलांच्या फांद्या सुकतात आणि मरतात.
  • कंदात गडद पिवळी ते लालसर आणि मऊ कूज दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
लसुण
कांदा

कांदा

लक्षणे

हवेत असणारी सापेक्ष आर्द्रतेवर लक्षणे मुख्यकरुन अवलंबुन असतात. जुन्या पानांवर आणि फुलांच्या फांद्यांवर छोटे, बेढब, खोलगट आणि पांढुरके ठिपके प्रथम येतात. जर सापेक्ष आर्द्रता कमीच राहीली तर त्याचा जास्त विकास दिसुन येत नाही. तरीपण जास्त सापेक्ष आर्द्रता असताना ह्या डागांच्या केंद्रात फिकट आणि गडद केंद्रीत लंबगोलाकार तपकिरी किंवा जांभळे धब्बे येतात. कालांतराने हे डाग काही सें.मी. लांब पसरतात आणि पिवळसर किनार असते. डाग एकमेकात मिसळुन पानाला किंवा फुलांच्या फांदीला वेढतात, ज्यामुळे सुकणे आणि मर होते. काढणीच्या वेळी कंदांना इजा झाल्यास त्यावरही हल्ला होऊ शकतो, जास्त करुन देठाकडे. साठवणीतील लक्षणे गडद पिवळी ते लालसर मऊ कूज कंदाच्या बाहेर किंवा आतल्या पाकळ्यात दिसते. कांदे, लसुण आणि लीक ह्या रोगाने प्रभावित होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव उपचार आजतागायत उपलब्ध नाहीत. शत्रु बुरशी क्लॅडोस्पोरियम हरबारमचा स्पर्श वापर अल्टरनेरिया पोरी जंतुंना दडपण्यासाठी विवोमध्ये केला गेला आहे, ज्यात संक्रमण ६६.६%नी कमी झालेले आढळले. पेनिसिलियम प्रजाती (५४ा%) सारख्या इतर बुरशी कमी प्रभाव देतात. पुष्कळ शत्रुंच्या मिश्रणाने ७१.९% प्रमाण कमी आले. तरीपण, ह्या अहवालांवर आधारुन कोणतेही व्यावसायिक उत्पाद विकसित केले गेले नाही. अॅझाडिराक्टा इंडिका (नीम) आणि धतुरा स्टामोनियम (जिमसनवीड) च्या द्रव अर्कांचा वापर करुन जांभळ्या धब्ब्यांचे जैविक नियंत्रण केले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संरक्षक बुरशीनाशकांचा वापर करुन बहुतेक व्यावसायिक कांदा पिकांचे जांभळ्या धब्ब्यांपासुन रक्षण केले पाहिजे. बोस्कालिड, क्लोरोथॅलोनिल, फेनामिडोन आणि मँकोझेब (सगळे ०.२०-०.२५% दराने) बुरशीनाशकांवर आधारीत द्रावणांची प्रतिबंधक फवारणी रोपणीनंतर एक महिन्याने सुरु करुन दर पंधरा दिवसांनी करा. कॉपर बुरशीनाशके जांभळ्या धब्ब्यांच्या नियंत्रणासाठी नोंदीकृत आहेत पण जांगला परिणाम देत नाहीत. प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन विविध कुटुंबातील बुरशीनाशके आलटुनपालटुन वापरा.

कशामुळे झाले

अल्टरनेरिया पोरि नावाच्या बुरशीमुळे जांभळे धब्बे येतात. ही संक्रमित पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीच्या वरच्या थरात विश्रांती घेते. जेव्हा वसंत ऋतुत ऊबदार आणि ओले हवामान असते तेव्हा तिचे जीवनचक्र बीजाणूंचे उत्पादन करुन परत सुरु होते. वारा, सिंचनाचे पाणी किंवा पावसाचे उडणारे पाणी याद्वारे बीजाणू निरोगी रोपात आणि शेतात पसरतात. तापमान २१-३० अंश आणि ८०-९०% सापेक्ष आर्द्रता अशी अनुकूल परिस्थिती असल्यास रोग होतो आणि लक्षणांची तीव्रता मोसम आणि जागेच्या परिस्थितीवर अबलंबुन असते. जेव्हा हिची लागण स्टेमफिलियम करप्याबरोबर होते तेव्हा नुकसान फारच गंभीर असते. मुख्यत: पात्याच्या जाडीमुळे जांभळ्या धब्ब्यांचा प्रतिकार केला जातो. पण शेतकामाच्या वेळी किंवा वाळुवादळामुळे जर जखमा झाल्या तर प्रतिकार कमी होतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन बियाणे घ्या.
  • शक्य असल्यास मोसमात पेरणी आणि रोपणी लवकर करा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण निवडा.
  • दोन हंगामांच्या मध्ये २-३ वेळा नांगरुन बुरशीला उन्हात उघडे पाडा.
  • रोपणी करताना रोपांमधील अंतर जास्त ठेवा.
  • मजबुत आणि निरोगी रोपे तयार होण्यासाठी नत्र आणि स्फुरदाची खते जास्त द्या.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियंत्रण चोख करा.
  • काढणीनंतर अवशेष आणि स्वयंभू रोपे काढुन टाका.
  • शेतकाम करताना रोपांना इजा होऊ देऊ नका.
  • जंतुं गोळा होऊन लोकसंख्येची पातळी जास्त होऊ नये म्हणुन दर २-३ वर्षांनी पीक फेरपालट करा.
  • कांद्यांना १-३ अंश आणि आर्द्रता ६५-७०% असणार्‍या आणि हवा खेळती असणार्‍या कूलरमध्ये साठवा.
  • कांद्यावरील फुलकिड्यांचे नियंत्रण करा कारण त्यांच्यामुळे रोपे अशक्त होऊन रोगास संवेदनशील होतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा