Diaporthe vexans
बुरशी
पानांवर, फांद्यांवर आणि फळांवर, जास्त करुन फळांवर लक्षणे दिसतात. पानांवर फिकट केंद्राचे राखाडी ते तपकिरी छोटे डाग येतात आणि अखेरीस संख्येने खूप वाढतात तसेच पानाचा मोठा भाग व्यापतात. गंभीरपणे संक्रमित पाने पिवळी पडतात आणि नंतर मरगळतात तसेच त्यांचे भाग चिरलेले, फाटलेले (पानांवरील करपा) असतात. फांदीवर तपकिरी ते गडद, फुटलेले आणि खोलगट कँकर्स दिसतात. रोपाच्या बुडाशी हे कँकर्स खोडाला वेढतात आणि पाणी तसेच पोषण वहनात बाधा घालतात, अखेरीस रोपाला मारतात. तपकिरी, मऊ, खोलगट डाग फळांवर येतात. जसे ते मोठे होतात तसे ते एकमेकात मिसळुन फळांचा मोठा पृष्ठभाग व्यापतात आणि त्यांच्या कडांवर काळ्या ठिपक्यांची केंद्रीत वलये दिसतात. अखेरील फळ कुजते. पानांवरील आणि फांद्यांवरील जुन्या डागातही छोटे काळे ठिपके दिसतात. जर परिस्थिती कोरडी झाली तर संक्रमित फळे आक्रसतात, सुकतात आणि रोपावरच ममीफाइड होतात.
रोगाच्या घटना आणि गंभीरता कमी करण्यासाठी सेंद्रिय बुरशीनाशकांचे उपचारही फायद्याचे असतात. कॉपर द्रावणांवर (उदा. बोरडॉक्स मिश्रण) आधारीत उत्पादांचा वापरही पानांवरील फवारे म्हणुन केला जाऊ शकतो. नीमचा अर्क सुरक्षित आणि पर्यावरणाला अनुकूल द्रावण आहे जे ह्या रोगाच्या व्यवस्थापनात वापरले जाते. बियाणांवर गरम पाण्याचे उपचार (५६ अंशात १५ मिनीटांसाठी) करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर शेतात रोग सापडला आणि आर्थिक सीमा ओलांडली जात असेल तर बुरशीनाशकांच्या उपचारांची शिफारस करण्यात येते. सर्वसामान्यपणे पानांवरील फवार्याच्या रुपात वापरण्यात येणारी बुरशीनाशके आहेत, अॅझोक्सिस्ट्रोबिन, बोस्कालिड, कप्तान, क्लोरोथॅलोनिल, कॉपर ऑक्झिक्लोराइड, डिथियोकार्बामेटस, मॅनेब, मँकोझेब, थियोफेनेट-मिथिल, टोलक्लोफॉस-मिथिल, पायराक्लोस्ट्रोबिन. जर शेतातील कल्चर नियंत्रण योजनेसोबत बुरशीनाशकांचा वापर केला तर परिणाम उत्तम मिळतो. बियाणांवरील उपचारही वापरले जाऊ शकतात उदा. थियोफेनेट मिथिल (०.२%).
फोमोप्सिस वेक्सान्स नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्याचे जंतु फक्त वांग्यातच (टोमॅटो आणि मिरचीत संक्रमण झाल्याचे काही अहवाल असले तरी) सीमित असतात. पिकांच्या कचर्यात बुरशी जगते आणि तिचे बीजाणू वार्याने आणि पावसाने निरोगी रोपांवर पसरतात. हे जंतु बियाणांवर आणि बियाणातही रहातात अशी विचारधारणाही आहे. ह्यामुळे ह्या रोगाशी लढा देण्यासाठी प्रमाणित आणि निरोगी बियाणे घेणे जास्त महत्वाचे ठरते. पानांत ६-१२ तासात प्रवेश होतो आणि उष्ण (२७-३५ अंश) तसेच सापेक्ष आर्द्र परिस्थितीची संक्रमणासाठी आणि विकासासाठी गरज असते. साठवणीच्या जागी फळांवरील डागांचा विकास बहुधा ३० अंश तापमान आणि ५०% सापेक्ष आर्द्रता असल्यास होतो.