Penicillium spp.
बुरशी
फळांच्या सालींवर मऊ पाणी शोषल्यासारखे भाग उमटणे ही सुरवातीची लक्षणे आहेत. काही दिवसांनंतर गोलाकार काही वेळेस काही सेंटीमीटर व्यास असणारी आणि थोडी उंचावटलेली पांढरी बुरशी या डागांवर येते. कालांतराने बुरशी सालीवर पसरते आणि बुरशी धरलेले जुने भाग निळसर किंवा हिरवट होतात. बाजुचे भागही पाणी शोषल्यासारखे मऊ होतात आणि त्यावरही पांढरे मायसेलियमचे मोठे पट्टे दिसु लागतात. फळे झपाट्याने कुजतात आणि गळतात किंवा कमी आर्द्रता असल्यास आक्रसतात आणि वाळतात.
सुडोमोनस सिरिंगे स्ट्रेन इएससी-१० वर आधारीत द्रवाणे वापरल्यास बुरशीवर जैविक नियंत्रण मिळविले जाऊ शकते. अॅगेराटम कोन्जियॉइड झाडाचा अर्कही बुरशीविरुद्ध परिणामकारक आहे. थायमस कॅपिटॅटस वनस्पतीचे अर्क तेल आणि नीम तेलाचे परिणाम सारखेच आहेत. सॅपोनिन चहाला सुरक्षित मिश्रण मानले जाते आणि याने काढणीनंतर फळांची कूज थांबविली जाते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. काढणी केलेल्या फळांना ४०-५० डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्याने साबणाबरोबर किंवा कमकुवत क्षारयुक्त द्रावणाने धुतल्यास, बहुधा काही कीटकनाशके देखील वापरल्यास, फळांची कूज कमी होते. इमॅझालिल, थाइबेन्डाझोल आणि बायफिनेलसारखी बुरशीनाशक द्रावणांची शिफारस करण्यात येते.
पेनिसिलियम कुटुंबातील बुरशीच्या दोन प्रजातींमुळे लिंबुवर्गीय फळांची कूज होते. पी इटालिकम आणि पी. डिगिटॅटम फळांच्या सालीवर निळसर बुरशी आणि हिरवट बुरशी म्हणुन क्रमश: वाढतात. निळे डाग हिरवट डागांपेक्षा हळु वाढतात आणि त्यांचा विकास देखील जुन्या वाढीला केंद्रात ठेऊुन वैशिष्ट्यपूर्ण कोवळ्या पांढर्या मायसेलियमच्या पट्ट्याने होतो. ही संधीसाधु बुरशी असुन फळाच्या पृष्ठभागावरील जखमांचा वापर करुन आत शिरते आणि जीवनचक्र सुरु करते. जखमेच्या भागातुन झिरपणारे पाणी आणि पोषकांमुळे बीजाणू उगवतात. जेव्हा तापमान २४ डिग्री सेल्शियस होते, तेव्हा ४८ तासात संक्रमण होते आणि ३ दिवसात सुरवातीची लक्षणे दिसतात. वहन यंत्र, पाणी किंवा वार्याद्वारे बीजाणूंच्या प्रसाराने संक्रमण पसरते. हे बीजाणू बहुधा जमिनीत रहातात पण साठवणीच्या ठिकाणी संक्रमण झाले असता हवेतही दिसतात.