इतर

काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग

Pseudoperonospora cubensis

बुरशी

थोडक्यात

  • पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळे डाग येतात.
  • मखमली आणि बारीक लव असलेली राखाडी वाढ पानांच्या खालच्या बाजुला आढळते.
  • खुजेपणा किंवा कोंब, फुले किंवा फळे मरतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
कारले
काकडी
खरबूज
लाल भोपळा
अधिक

इतर

लक्षणे

पिकांमधील किरकोळ फरक असूनही, वेलवर्गीय पिकांवरील केवड्याचे वैशिष्ट्य आहे पिवळे कोनेदार डाग पानाच्या वरच्या बाजुला येणे जे मोठ्या शीरांच्या पलीकडे वाढत नाहीत. शीरांमधील पिवळेपणा हळुहळु पिवळ्या ते तपकिरी ठिगळ सौंरचनेत बदलतो ज्याची गल्लत विषाणूंच्या संक्रमणाशी केली जाऊ नये. पानावरील डागांच्या बरोबर खालच्या बाजुला पाणी शोषल्याचे डाग येतात जे थंड तापमानात आणि जास्त काळ असलेल्या आर्द्रतेत हळुहळु फिकट राखाडी, मखमली, बारीक लव असलेले होतात. बुरशी झाडातुन पोषके घेत असल्याने, शेंडे, फुल व फळे बारीक होतात ज्यामुळे उत्पादनात घट होते. भुरीच्या तुलनेत, पांढरी भुकटी पानांच्या खालच्या भागावर पूर्णपणे दिसून येते आणि त्याची वाढ मुख्य शिराद्वारे मर्यादित होते. शिवाय, ते सहज काढता येत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बाजारात केवड्यावरील बरेच जैविक उपचार उपलब्ध आहेत. सौम्य बाबतीत हवामान चांगले होण्यासाठी थांबणे आणि काहीही न करणे बहुधा चांगले असते. काही वेळा संक्रमणा आधी वापरण्याची बोर्डोक्स मिश्रण सारखी कॉपरवर आधारीत सेंद्रिय बुरशीनाशके रोगाची लागण टाळण्यात मदत करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रतिबंधक बुरशीनाशके झाडांना दूषित होण्यापासुन वाचविण्यात मदत करतात पण त्यांची फवारणी पानाच्या खालच्या बाजुला व्यवस्थित केला गेला पाहिजे. मँकोझेब, क्लोरोथॅलोनिल किंवा कॉपरवर आधारीत द्रावणे वापरली जाऊ शकतात. संक्रमण झाल्यानंतर पहिली लक्षणे दिसताच लगेच बुरशीनाशकांचा वापर करायला हवा. सामान्यपणे वापरण्यात येणारी बुरशीनाशके आहेत मेफेनोक्साम, स्ट्रोबिल्युरिन्स, फ्ल्युयोपिकोलाइड, फॅमोक्झाडोन+सायमॉक्झॅनिल, साय़ाझोफॅमिड आणि झोक्सामाइड आहेत. यातील काही उत्पादांविरुद्ध प्रतिकार पाहण्यात आला आहे.

कशामुळे झाले

पाण्यातील बुरशीच्या गटातील स्युडोपेरोनोस्पोरा क्युबेनसिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बंधनकारक बुरशी असुन हिला जगण्यासाठी जिवंत हिरव्या झाडाच्या भागांची गरज असते. सावली असणार्यां भागात जिथे थंड, ओलेपणा आणि दमट हवामान (जास्त दव, धुक, पाऊस) आणि १५-२३ अंश सेल्शियसचे तापमान असते तिथे ही खूप नुकसान करते. बुरशी झाडाच्या अवशेषात, कोंबात किंवा पर्यायी यजमानात (पिके आणि तण) रहाते. अनुकूल हवामानात वारा, वार्याडच्या झुळका आणि पावसाच्या उडणार्याा थेंबांनी बीजाणू निरोगी रोपांच्या भागात पसरतात. एकदा का ते संवेदनशील यजमानांवर पडले, की बीजाणू उगतात आणि अशी रचना तयार करतात जी पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन झाडात प्रवेश करतात. तिथे ते पसरतात अखेरीस त्यांचे प्रमाण आतील भागांपेक्षा जास्त होते आणि ज्यामुळे बाहेरच्या बाजुला बुरशीचा वैशिष्ट्यपूर्ण थर दिसतो. तिथे बीजाणू तयार होतात जे रोगाचा प्रसार अजुन जास्त करतात.


प्रतिबंधक उपाय

  • बियाणे आणि रोप रोगमुक्त आहेत याची खात्री करा.
  • काकडीवर्गीय पिकांची मोसमात लवकर लागवड करा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • चांगला सुर्यप्रकाश लाभेल असे ठिकाण व लागवडीची दिशा निवडा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण निवडा.
  • वारा खेळता राहील अशा पद्धती वापरुन झाडे कोरडी ठेवा.
  • सिंचन संध्याकाळी देण्याऐवजी सकाळी द्या.
  • जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला होतोय याची खात्री करा आणि पाने ओली असताना शेतात काम करु नका.
  • वेलींना जमिनीवर पडु देऊ नका आणि योग्य रीतीने चढवा.
  • झाडाचा जोम राखण्यासाठी संतुलित खत देण्याची काळजी घ्या.
  • झाडाची ताकत राखण्यासाठी वाढ संप्रेरके वापरले जाऊ शकतात.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण नियंत्रण करा.
  • शेतातुन झाडाचे अवशेष काढुन टाका.
  • एका शेतातुन दुसर्याण शेतात काम करण्याआधी हत्यारे आणि अवजारे तसेच कामगारांचे हात स्वच्छ धुतले जात आहेत याची काळजी घ्या.
  • संक्रमित माती आणि वनस्पतींची सामग्री एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरणार नाही याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा