Pseudocercospora pistacina
बुरशी
रोगामुळे पानांच्या दोन्ही बाजुंना गोलाकार ते बेढब, वाळलेले, तपकिरी ते गडद तपकिरी रंगाचे ठिपके येतात. पानांवर हे ठिपके मोठ्या संख्येने येतात आणि १ ते २ मि.मी. व्यासापर्यंत वाढतात. कालांतराने, पानाची पाती हळु-हळु फिकट हिरवी होतात आणि नंतर तपकिरीसर होतात ज्याची सुरवात कडांपासुन होऊन मध्य शिरेपर्यंत पसरत जाते. जास्त संक्रमणामुळे पाने कोमेजतात आणि अकाली गळतात. खूप बारीक ठिपके फळांवरही येतात. रोगाच्या गंभीर उद्रेकाने अकाली पानगळ होते आणि झाडाचा जोम कमी होतो. संक्रमनाची सुरवात बहुधा एप्रिलमध्ये होते तिचे लसीकरण गेल्या वर्षीच्या गळलेल्या पानांच्या अवशेषातुन होते.
पहिले लक्षण दिसताच कॉपर किंवा गंधकवर आधारीत उत्पादनांची फवारणी करावी. फळे सुमारे १ सें.मी.ची झाल्यानंतरच फवारणी करावी जेणेकरुन अगदी कोवळ्या फळांचे फयटोटॉक्झिक नुकसान टाळता येते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पहिला ठिपका दिसताक्षणीच थयोफेनेट-मिथाइल हा सक्रिय घटक असलेल्या उत्पादनांची फवारणी २-३ वेळा करावी. झिनेब, मँकोझेब, क्लोरोथॅलोनिल किंवा कॉपर बुरशीनाशकांचे उपचारही प्रभावी असतात पण ह्यांचा वापर फळे १ सें.मी. आकाराची झाल्यानंतर करावी जेणेकरुन अगदी कोवळ्या फळांचे फयटोटॉक्झिक नुकसान टाळता येते. प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन विभिन्न सक्रिय घटक असलेली उत्पादने आळीपाळीने वापरावीत. कळ्या लागल्यापसुन प्रतिबंधक उपाय केल्यासही रोगाच्या घटना होण्यास प्रतिबंध करण्यात प्रभावी ठरते.
मायकोस्फेरेला कुटुंबातील अनेक बुरशींमुळे लक्षणे उद्भवतात, मेडीटेरियनमध्ये प्रामुख्याने एम. पिस्तासिना. ही गेल्या वर्षी संक्रमित होऊन गळलेल्या पानांत विश्रांती घेते. बुरशीची प्रमुख लागण ही ह्या पानांतुनच होते. पावसाच्या उडणार्या पाण्यामुळे बीजाणूंच्या प्रसारास मदत मिळते. दुय्यम संक्रमण हे हंगामात उशीरा दुसर्या प्रकारच्या बीजाणुंमुळे होते ज्यांचा प्रसारही पावसाद्वारे किंवा तुषार सिंचनाद्वारे होतो. २०-२४ अंशातील उच्च तापमान, आर्द्र हवामान आणि धुक हे जंतुंच्या वंशवृद्धी आणि प्रसारासाठी अनुकूल असते.