Mycovellosiella fulva
बुरशी
लक्षणे बहुधा पानांच्या दोन्ही बाजुला दिसतात आणि काही वेळा फळांवर देखील दिसतात. जुन्या पानांवर संक्रमण पहिल्यांदा होते आण मग रोग हळुहळु वर चढत कोवळ्या पानांवरही येतो. पानांच्या वरच्या पृष्ठभागावर, बारीक विखुरलेले फिकट हिरवे किंवा पिवळसर अनियमित कडा असलेले ठिपके उमटतात. पानांच्या खालच्या बाजुला गडद हिरवे ते राखाडीसर जांभळे आणि मखमलीसारखे डाग ठिपक्यांच्या खाली उमटतात. हे भाग म्हणजे बीजाणू तयार करणारी रचना आणि बीजाणूंचे समूह (कोनिडिया) असतात. कालांतराने ठिपके मोठे होतात, संक्रमित पान पिवळा पडून करपतो आणि पाने गोळा होऊन वाळतात. गंभीर प्रकरणात झाडाची अकाली पानगळ होते. काही वेळा या बुरशीमुळे फळ किंवा फुलांवर देखील वेगवेगळी लक्षणे दिसतात. फुल काळे पडून फळधारणेआधीच वाळू शकतात. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या देठा जवळ गुळगुळीत अनियमित काळे भाग दिसतात. जसे रोग वाढतो, संक्रमित भाग खोलगट, कोरडी आणि जाड बनतात.
बियाणांत जंतु टाळण्यासाठी गरम पाण्याने (१२२ डिग्री फॅ. किंवा ५० डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्यात २५ मिनीटे) बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते. अॅक्रेमोनियम स्ट्रिक्टम, डिसिमा पल्व्हिनाटा, ट्रायकोडर्मा हरझियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिड आणि ट्रायकोथेशियम रोझियम बुरशी ही या बुरशी विरोधात असल्याने हिचा प्रसार रोखण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. हरितगृहातील टोमॅटोवरील प्रयोगात या बुरशीची वाढ ए. स्ट्रिक्टम, ट्रायकोडर्मा व्हिरिड स्ट्रेन ३ आणि टी. रोझियम वापरुन ५३, ६६ आणि ८४% क्रमश: कमी झालेली दिसुन आली आहे. लहान क्षेत्रात बुरशीच्या उपचारांसाठी सफरचंदाचा रस, लसुण किंवा दूधाचे फवारे आणि सिरक्याची मिश्रणे वापरली जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संक्रमण होण्याआधी जेव्हा हवामान रोगाच्या विकासासाठी अनुकूल असते तेव्हाच उपचार केले गेले पाहिजेत. क्लोरोथॅलोनिल, मॅनेब, मँकोझेब आणि कॉपरची द्रावणे उघड्या शेतीत वापरासाठी शिफारस केली जातात. हरितगृहांसाठी, डायफेनोकोनॅझोल, मॅडिप्रोपॅमिड, सिमोक्झॅनिल, फॅमोक्झॅडोन आणि सायप्रोडिनिलची शिफारस केली जाते.
मायकोव्हेलोसिएला फुलवा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जिचे बीजाणू यजमानाशिवाय ६ महिने ते एक वर्षापर्यंत सामान्य तापमानात (बंधनकारक नसणारी) जिवंत राहू शकतात. पाने फार काळ ओली रहाणे आणि आर्द्रता ८५%च्या वर असल्यास बिजाणू उगवण्यास अनुकूल असते. बीजाणू उगवण्यासाठी तापमान ४ ते ३४ डिग्री सेल्शियसमध्ये आणि त्यातही २४ ते २६ डिग्री सेल्शियसचे तापमान बहुधा असले पाहिजे. कोरडे हवामान आणि पानांवर पाणी नसणे हे उगवण्यात अडथळा आणतात. लक्षणे बहुधा संक्रमण झाल्यावर १० दिवसांनी पानांवर दोन्ही बाजुला ठिपक्यांचा विकास होऊन दिसु लागतात. पानाच्या खालच्या बाजुला बीजाणू निर्माण करण्याच्या बरेचशा रचना तयार होतात आणि हे बीजाणू एका रोपावरुन दुसर्या रोपावर सहजपणे, वारा, पाण्याच्या उडण्यानेच नाही तर हत्यारे, कामगारांचे कपडे आणि किड्यांद्वारे देखील पसरतात. जंतु बहुधा पानांना उच्च आर्द्रता असताना नैसर्गिक छिद्रामधुन शिरकाव करुन संक्रमित करतात.