द्वीदल धान्य

चपट्या वालावरील तपकिरी ठिपके

Botrytis fabae

बुरशी

थोडक्यात

  • पान, फांद्या आणि फुलांवर बरेच बारीक लालसर तपकिरी ठिपके येतात.
  • कालांतराने ते मोठे होऊन एकमेकात मिसळून पानावर तपकिरी रंगाचे डाग तयार होतात.
  • या रोगाच्या आक्रमक (परंतु दुर्मिळ) स्वरूपामध्ये पान काळपट पडून त्यावर तपकिरी रंगाची भुकटी पसरते.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

हा रोग फक्त चपट्या वालालाच होतो आणि त्याचे वैशिष्ट्य बरेचसे बारीक लालसर तपकिरी ठिपके मुख्यतः पानांवर पण फांद्या आणि फुलांवर देखील येतात. जसे ते मोठे होतात तसे करपट केंद्र विकसित होतात, ज्या भोवती लालसर तपकिरी कडा निर्माण होतात. हे ठिपके एकमेकात मिसळून पानांवर तपकिरी रंगाचे डाग तयार करतात. या रोगाच्या आक्रमक (परंतु दुर्मिळ) स्वरूपामध्ये पान काळपट पडून त्यावर तपकिरी रंगाची भुकटी पसरते. अखेरीस यामुळे झाडाची वाढ खुंटते किंवा फुटवे प्रणालीच्या काही भागांची वा पूर्णपणे मर होते. काही वेळा, कळ्या अकाली गळतात. शेंगा तरीही खाल्ल्या जाऊ शकतात पण त्या रंगहीन असतात. आधी सांगीतलेल्या प्रकारच्या हल्ल्यामुळे रोगाची साथ येऊन जास्त नुकसानाचा होण्यास कारणीभूत आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी या रोगासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नियंत्रण पद्धत सापडलेली नाही. तरीपण पीक कमजोर किंवा इतर कोणत्याही हल्ल्याला संवेदनशील होऊ नये याची काळजी घ्यावी.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजपर्यंत तरी या रोगासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नियंत्रण पद्धत सापडलेली नाही. काही वेळा फुलधारणेच्या काळात बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्यास उत्पादनाचे जास्त मोठे नुकसान टाळले जाऊ शकते.

कशामुळे झाले

जरी बोट्रिटिसच्या इतर प्रजातीही यात सहभागी असल्या तरी, बोट्रिटिस फेबे नावाच्या बुरशीमुळे फाबा बिन्सवरील लक्षणे उद्भवतात. ठिपक्यांच्या मधल्या कोरड्या भागात बीजाणू तयार होतात आणि पसरुन इतर निरोगी झाडांना संक्रमित करतात. हे बीजाणू अनुकूल परिस्थितीत पानांवर एक महिना किंवा जास्त काळ टिकु शकतात. उच्च आर्द्रता, वारंवार पाऊस, पाने जास्त काळ ओली रहाणे आणि १५-२२ अंशाचे तापमान हे संक्रमाणासाठी उत्तम असते. ज्या कोणत्याही घटकांमुळे (वारा, कोरडे हवामान) पानांवरील आर्द्रतेचे बाष्पीभवन होते ते संक्रमणास कमी करतात किंवा अडथळा करतात. आम्ल जमिनी, दाट लागवड, पालाश किंवा स्फुरदाची कमतरता किंवा पाणी साचणे यासारख्या पिकाला कमजोर करु शकणाऱ्या इतर परिस्थितीमुळे रोग किंवा त्याचे आक्रमक स्वरूप धारण करू शकते. रब्बी आणि सावलीमध्ये लागवड केलेले पीक जास्त संवेदनशील असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन निरोगी बियाणे घ्या.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • मागच्या हंगामातील फाबा बिन्सचे क्षेत्र लागवडीसाठी निवडू नका.
  • या रोगास उच्च प्रतिकारक असणारे वाण लावा.
  • गरज वाटल्यास चुनखडी वापरून जमिनीचा सामू सुधारा.
  • संतुलित खते देण्याची काळजी घ्या.
  • नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात देऊ नका.
  • या रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा