बीट

बीटच्या पानांवरील कॉसस्पोरॉमुळचे ठिपके

Cercospora beticola

बुरशी

थोडक्यात

  • लाल तपकिरी कडांसह हलका तपकिरी किंवा राखाडी रंगाचे ठिपके पाने, फांद्या आणि देठांवर दिसतात.
  • डाग एकमेकात विलीन होऊन, पान तपकिरी पडते मुडपते आणि मरते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
बीट

बीट

लक्षणे

हा रोग पहिल्यांदा जुन्या खालच्या पानांवर सुरु होतो, आणि मग कोवळ्या पानांवरही पसरतो. हलके तपकिरी किंवा राखाडी, गोल किंवा अंडाकृती डाग (२-३ मि.मी. व्यास) पाने आणि देठांवर दिसतात या सुकलेल्या भागांच्या कडा लाल-तपकिरी असतात. ठिपके अनेकदा एकमेकात विलीन होतात, आणि त्यांचे केंद्र सुकुन गळते, ज्यामुळे पानांवर (बंदुकीने गोळी मारल्यासारखी) छिद्रे दिसतात. हळूहळू पाने देखील रंगहीन होतात, पहिल्यांदा पिवळी पडतात व नंतर ती तपकिरी होऊन सुकतात आणि मरतात. दूर अंतरावरुनही, प्रभावित रोपे भाजल्एयासारखी दिसतात आणि झाडीतुन वेगळी ओळखता येतात. फांद्या आणि देठावरील डागही लांबट होतात आणि अनेकदा किंचित खोलगट होतात. दीर्घकाळ जास्त ओली परिस्थिती राहील्यास, , गडद तपकिरी मखमलीसारखे बुरशीजन्य वाढ प्रामुख्याने पानांच्या खालच्या बाजुला डागांच्या बरोबर खाली दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जीवाणू स्यूडोमोनस फ्लुरेसेन्स, बॅसिलस एमिलोलिक्वेफेशियन्स, बॅसिलस सबटिलस आणि बुरशी ट्रायकोडर्मा असपीरेलमवर आधारित उत्पाद पानांवरील जैव फवारणीत येतात. किंवा, बियांचा पृष्ठभाग साफ करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी गरम पाण्याचे उपचार केले जाऊ शकतात. सेंद्रीय शेतीत कॉपरवर आधारित उत्पाद (कॉपर ऑक्सीक्लोराईड) ही स्वीकृत पद्धत आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. नेहमी एकात्मिक दृष्टीकोन प्रथम ठेवा. जंतुंचे नियंत्रण करण्यासाठी, ट्रायाझोल बुरशीनाशके (डायफेनोकोनाझोल, प्रॉपिकोनाझोल, सायप्रोकोनाझोल, टेट्राकोनाझोल, एपोक्सिकोनाझोल, फ्लुट्रियाफॉल, इत्यादी), किंवा बेंझिमिडाझोल्स वापरा.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा बेटिकोला नावाच्या बुरशीमुळे रोग होतो, जी जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा जमिनीच्या वरच्या थरांतील रोपाच्या कचर्‍यात रहाते. हे बीट्स (पिग्वीड, गुजफूट, थीस्ल) सारख्या पर्यायी यजमानांत विश्रांती घेते, जे बीट्ससाठी संक्रमणाचे स्रोत होतात. बुरशीच्या विकासासाठी उत्तम परिस्थिती, उच्च आर्द्रता (९५-१००%), वारंवार दव आणि उबदार हवामान आहेत. नत्र खतांचा अति वापर रोगाच्या घटनेत वाढ करतात. रोग बर्‍याचदा शेतात अनियमितपणे पसरतो, सामान्यत: सावलीच्या भागात, ज्यामुळे आर्द्रता जास्त प्रमाणात होऊ शकते, जास्त गंभीर असतो . जगभरातील साखर बीटचा हा सर्वात विध्वंसक असा पानावरील रोग आहे. डागांच्या लहान आकारामुळे आणि डागांच्या मध्यभागी असलेल्या काळ्या ठिपक्यांमुळे सर्कोस्पोरा संक्रमण इतर पानांच्या रोगांपासून (अलटरनेरिया, फोमा आणि जिवाणूजन्य पानांवरील ठिपके) वेगळे काढता येते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित, रोग मुक्त बियाणे वापरण्याची खात्री करा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिरोधक वाण लावा.
  • जर जमिन खूप आम्लीय असेल सामू वाढवण्यासाठी चुना वापरावा.
  • फवारा सिंचन टाळा कारण पाने दीर्घकाळा जास्त ओली रहातात, त्याऐवजी ठिबक सिंचन वापरा.
  • दुपारी पाणी द्या कारण यामुळे पाने पूर्णपणे कोरडी होऊ शकतात.
  • स्फुरद, मॅगनीज आणि बोरॉनची संतुलित खते द्या.
  • शेतातील तण काढा.
  • रोपांचे अवशेष काढून खोल पुरा किंवा जाळा.
  • एक फाळाच्या नांगराने खोल नांगरा ज्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होईल.
  • काढणीनंतर मातीतील ढेकळ फोडण्यासाठी आणि मातीत हवा खेळण्यासाठी नांगरणी करा.२-३ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा