Stagonosporopsis cucurbitacearum
बुरशी
रोपांवरील पान आणि फांदीवर सुरुवातीला गोल, पाणी शोषल्यासारखे, काळे किंवा गव्हाळ डाग येतात. जुन्या झाडावर गोलाकार ते अनियमित गव्हाळ ते गडद तपकिरी डाग पानांवर बहुदा पहिल्यांदा कडांवर किंवा कडांजवळ दिसतात. पूर्ण पान व्यापेपर्यंत हे डाग झपाट्याने वाढत जातात. फांदीच्या वाहक भागात कँकर्स तयार होतात आणि तपकिरी चिकट स्त्राव बहुधा पृष्ठभागावर दिसतो. काळे ठिपके बहुधा डागात दिसतात जी बुरशीची बीजाणू फळे असतात. फांद्या पूर्ण वेढल्या जातात आणि अंकुर किंवा कोवळी रोपे मरतात. जर जुन्या झाडात संक्रमण झाले तर डाग हळुहळु फांद्यांवर गाठीच्या भागाच्या मध्यात वाढतात. कँकर झालेल्या फांद्या बहुधा हंगामाच्या मध्यावर वाळतात आणि चिरतात. संक्रमित फळांवर बारीक पाणी शोषल्यासारखे डाग येतात जे मोठे होऊन अमर्यादित आकाराचे होतात आणि त्यातुन चिकट स्त्राव गळतो.
रेनौट्रिया सॅचालिनेन्सिसचा अर्क सेंद्रिय लागवडीत वापरला जाऊ शकतो. बॅसिलस सबटिलिस स्ट्रेन क्युएसटी ७१३ सुद्धा या रोगाविरुद्ध परिणामकारक ठरला आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब, मॅनेब, थियोफेनेट-मिथाइल आणि टेब्युकोनाझोलसारखी स्पर्शजन्य बुरशीनाशके या रोगाविरुद्ध परिणामकारक ठरली आहेत.
स्टॅगोनोसपोरोप्सिस कुकुरबिटासेरम नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी या कुटुंबातील बरेचशा पिकांना संक्रमित करु शकते. जंतुंचे वहन होऊ शकते किंवा बियाणे संक्रमित असु शकतात. यजमान झाडाच्या अनुपस्थितीत, ती एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ संक्रमित झाडाच्या अवशेषात राहू शकते. वसंत ऋतुत जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा बीजाणू तयार केले जातात, जे संक्रमणाचा प्राथमिक स्त्रोत बनतात. ओलावा, ८५ %पेक्षा जास्त आर्द्रता, पर्जन्यमान आणि पानांची ओलावा कालावधी (१ ते १० तासांपर्यंत) यशस्वी संसर्ग आणि लक्षणे विकासासाठी निर्धारित आहेत. रोगासाठी अनुकूल तापमान हे प्रजातींवर अवलंबून असते आणि ते २४ अंश सेल्सिअस कलिंगडात आणि काकडीत तर १८ डिग्री सेल्शियस खरबुजामध्ये असते. बिजाणूंचा शिरकाव थेट त्वचेतुन होतो आणि नैसर्गिक छिद्र किंवा जखमांची गरज भासत नाही. जखम, पट्टेवाल्या काकडीवरील भुंगे आणि माव्याचे उपद्रव त्याबरोबर भुरीच्या संक्रमणामुळे झाड संसर्गास संवेदनशील होतात.