Alternaria cucumerina
बुरशी
झाडाच्या मधल्या किंवा वरच्या भागातील जुन्या पानांवर बारीक, गोलाकार, गव्हाळ रंगाचे पांढरे केंद्र असलेले डाग सुरवातीच्या लक्षणात दिसतात. हे डाग मोठे होऊन, फिकट तपकिरी होऊन थोडे खोलगट भाग तयार करतात. पानांच्या डागाच्या आतील शीरा गडद होतात ज्यामुळे जाळ्यासारखे दिसते. कालांतराने पानाच्या वरच्या बाजुला डागाच्या सभोवताली केंद्रीत वर्तुळे तयार होतात ज्यामुळे डाग नेमबाजीच्या लक्ष्यासारखे दिसतात. हे गोलाकार डाग अखेरीस पूर्ण पानास व्यापतात आणि पानगळ होते. गोलाकार, तपकिरी खोलगट भाग संक्रमित फळांवर येतात जे नंतर गडद हिरव्या ते काळ्या भुकटी सारख्या आवरणाने आच्छादले जातात. काढणीच्या वेळचे फळांवरील न निदान झालेल्या संक्रमणामुळे साठवणीत किंवा वहनातील मालात नुकसान उद्भवते. झाडाच्या इतर भागांवर थेट प्रभाव पडत नाही.
वाळलेले गवत लागवड केल्यानंतर जमिनीवर पसरल्यास ए. कुकुमेरिनाच्या बीजाणूंचा प्रसार जमिनीतुन खालच्या पानांवर होणे कमी होते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅझॉक्सिस्ट्रोबिन, बोस्कॅलिड, क्लोरोथॅलोनिल, कॉपर हायड्रॉक्साइड, मँकोझेब, मॅनेब किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट असणारी बुरशीनाशके या रोगाचे नियंत्रण करु शकतात. तरीपण क्लोरोथेलोनिल असणारे उत्पाद सर्वात जास्त परिणामकारक ठरली आहेत. या घटकांचा परिणाम वापराचे वेळापत्रक आणि वारंवारतेनुसार बदलतात. वापराच्या सूचना वापरा आधी नीट समजावुन घेण्याची काळजी घ्या.
जमिनीत रहाणार्या अल्टरनेरिया कुकुमेरिना नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे कलिंगडात आणि इतर संबंधित वेलवर्गीय प्रजातीत उद्भवतात. ही जमिनीतील झाडांच्या अवशेषात किंवा तणांवर आणि इतर वेलवर्गीय यजमानात रहाते. पावसाच्या उडणार्या पाणी, जास्त सिंचन, वारा, लागवड, अवजारे आणि शेतातील कामगार ह्यांद्वारे रोगाचा प्रसार होतो. ऊबदार तापमान आणि दव,पाऊस आणि तुषार सिंचनामुळे दमट हवामान या रागाला मानवते. संक्रमण पाने ओली असताना दोन ते आठ तासात सुरु होते पण पाने किती वेळ ओली रहातात याप्रमाणे संक्रमणाची जोखिम पातळी उंचावते. पाऊस एकुण किती पडतो यापेक्षा वारंवार पाऊस आणि दिवसातुन किती वेळ दव पडते याची रोगाच्या वाढीत महत्वाची भूमिका आहे.