Erysiphe diffusa
बुरशी
भूरी प्रथम बारीक गोलाकार भागात पांढर्याप पावडरीसारख्या बुरशीची वाढ पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसते. संक्रमित भाग पसरुन पानाच्या खालच्या आणि वरच्या बाजुला मोठे भाग व्यापतात. फांद्या आणि शेंगातही बुरशीची वाढ दिसु शकते. जास्त संक्रमण झाल्यास सोयाबीनच्या रोपाचे सर्व भाग पांढर्या ते फिकट राखाडी रंगाच्या पावडरीसारख्या बुरशीने आच्छादीत होतात. काही सोयाबीनच्या वाणात पाने पिवळी पडणे आणि पानांच्या खालच्या बाजुला लालसर डाग दिसणे अशी लक्षणे देखील दिसतात. जास्त संक्रमित रोपाची अकाली पानगळ होते. जास्त संक्रमित शेंगांत विशिष्टपणे आक्रसलेले, नीट वाढ न झालेले, विकृत आकाराचे आणि चपटे हिरवे दाणे दिसतात.
छोट्या शेतात, दूध पाण्याचे द्रावण नैसर्गिक बुरशीनाशक म्हणुन काम करते. या द्रावणाची दर दुसर्या दिवशी फवारणी करावी. लसुण आणि सोडियम बायकार्बोनेटची द्रावणेसुद्धा चांगला परिणाम देतात. विरघळणार्या गंधकाचे ३ ग्रॅ./ली. पाणी फवारल्यासही प्रभावी असते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पाण्यात विरघळणारे गंधक, ट्रिफ्ल्युमिझोल, मायक्लोब्युटानिलवर आधारीत बुरशीनाशके काही पीकांत या बुरशीची वाढ नियंत्रणात ठेवतात.
एरिसिफे डिफ्युसा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जिचे बीजाणू मुख्यत: वार्याने निरोगी भागात पसरतात. बीजाणू उगवल्यानंतर पेशीत शिरतात, जिथे ते नळकांडे आणि स्वत:ला पानांच्या पेशींना चिटकण्यासाठी एक भाग तयार करतात. अखेरीस, यामुळे पोषण संरचना आणि वाढ होते ज्यामुळे सोयाबीनच्या पानाच्या पापुद्र्यांपलीकडेपण (पांढरे आवरण) वाढ दिसते. वायुजन्य बीजाणू नवीन संक्रमण सुरु करुन सोयाबीनचे रोपे परिपक्व होईपर्यंत रोगाचे चक्र चालूच ठेवतात. जर तापमान ३० डिग्री सेल्शियसच्या वर गेले तर रोगाचा विकास कमी होतो आणि थंड हवामान त्याला मानवते. रोगावर पावसाचा काही परिणाम होताना दिसत नाही. जरी सोयाबीनची रोपे वाढीच्या सर्व टप्प्यात संवेदनशील असतात, तरी लक्षणे शक्यतो मध्य ते शेवटच्या टप्प्यातच दिसतात.