इतर

मसुर पिकावरील तांबेरा

Uromyces viciae-fabae

बुरशी

थोडक्यात

  • छोटे, सफेदसर, थोडे उंचावलेले डाग पानांच्या वरच्या पृष्ठभागावर दिसतात.
  • जसे ते मोठे होतात तसे डाग पावडरीसारखे आणि नारिंगी रंगाचे होतात आणि बहुधा फिकट किनारीचे होतात.
  • हे फोड पानांच्या खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही बाजुला, देठांवर आणि शेंगांवर येतात.
  • जास्त संसर्ग झाला असता पानगळती होते, रोपाची वाढ खुंटते आणि अकाली मरते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
हरभरा
मसूर
वाटाणा

इतर

लक्षणे

पाने, देठ आणि शेंगा बाधीत होतात. पहिले लक्षण छोटे, सफेदसर थोडे उंचावलेले धाग पानांच्या वरच्या पृष्ठभागावर दिसतात. जसे ते मोठे होतात तसे हे डाग पावडरीसारखे आणि नारिंगी किंवा तपकिरी रंगाचे होतात आणि फिकट किनार असते. हे फोड पानांच्या खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही बाजुला, देठांवर आणि शेंगांवर दिसतात. नंतरच्या टप्प्यावर, दुय्यम फोड ह्या मुख्य फोडांच्या आत तयार होतात ज्यामुळे गोलाकार आकार आणि मध्ये ठिपका असे दिसते. तांबेरा येणे आणि त्याची गंभीरता हे त्यावेळी असणार्‍या हवामानावर अवलंबुन आहे. जेव्हा तापमान २० डिग्री सेंटिग्रेडच्या वर असते तेव्हा तांबेरा झाडावर झपाट्याने वाढतो आणि अक्षरश: झाडाला आच्छादितो. जास्त लागण झाल्यास पानगळती होते, रोपाची वाढ खुंटते आणि अकाली मरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

तांबेर्‍याविरुद्ध कोणतेही जैव नियंत्रण उपलब्ध नाही. नीम तेल, जत्रोफा ते किंवा राईच्या तेलाचे प्रतिबंधक फवारे मारल्यास ह्या रोगाची गंभीरता कमी होते आणि नियंत्रणाच्या तुलनेत पीक चांगले येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फिनिलमर्क्युरी अॅसिटेट आणि डायक्लोब्युट्राझोल वापरुन बियाणांचे उपचार केल्यास बियांणांद्वारे ह्यांचे वहन होत नाही. लक्षणे दिसताच पानांवरील बुरशिनाशकांचे फवारे मारुन परत १० दिवसांच्या अंतराने दोन वेळा आणखीन फवारल्यास ह्या रोगाची गंभीरता कमी होते. मसुरीवरील तांबेर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी फ्ल्युट्रियाफोल, मेटालाक्झिल किंवा ट्राइधमॉर्फची शिफारस करण्यात येत आहे. इतर उत्पादात द्रावणे येतात ज्यात मँकोझेब क्लोरोथॅलोनिल आणि कॉपर आहे.

कशामुळे झाले

युरोमायसेस व्हिशिए-फेबे नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे दिसतात जे कोणतीही पिके उपलब्ध नसताना रोपांच्या अवशेषांत, आपोआप उगवलेल्या रोपांत आणि तणांत जिवंत रहातात. तांबेरा सहभागाची दुषितता म्हणुन बियांतही वाहन नेले जातात. ह्याचे पर्यायी यजमान खूप कमी आहेत ज्यात मसुरीबरोबरच घेवडा आणि वाटाणेही येतात. जेव्हा हवामान अनुकूल असते(१७-२५ डिग्री सेल्शियस आणि पाने खूप वेळ ओलेती रहाणे) तेव्हा हे बीजांडे उत्पन्न करतात जी वार्‍याबरोबर लांब अंतरापर्यंत नविन रोपांना किंवा शेतांना बाधीत करण्यासाठी वाहुन जातात. ह्याच्या प्रसाराचे इतर पर्याय आहेत रोपांच्या अवशेषांना शेतांत वाहुन नेणे, दूषित गवत, आणि दुषित कपडे, हत्यारे आणि अवजारे. ह्याच्या प्रसाराच्या क्षमतेमुळे तांबेर्‍याला उच्च आर्थिक धोका मानले गेले आहे.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरण्याची खात्री करा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिरोधक प्रकार वापरा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फिरवणी करा.
  • शेतातुन तण आणि आपोआप उगवलेली रोपे काढून टाका.
  • शेताचे रोगाच्या लक्षणांसाठी निरीक्षण करा.
  • बाधीत रोपाचे सामान दुसर्‍या शेतात किंवा भागात न नेण्याची काळजी घ्या.
  • हत्यारे आणि अवजारे शेतकामानंतर साफ करुन निर्जंतुक करा.
  • कापणीनंतर बाधीत रोपांना काढुन जाळुन, खरवडुन आणि खोल पुरुन टाकण्याची काळजी घ्या.
  • अतिशय वाईट लागण टाळण्यासाठी पेरणीची तारीख बदला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा